शरद पवारांनी बोलावलेली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक संपली : अनिल देशमुखांना द्यावा लागणार गृहमंत्रीपदाचा राजीनामा ?

शरद पवारांनी बोलावलेली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक संपली : अनिल देशमुखांना द्यावा लागणार गृहमंत्रीपदाचा राजीनामा ?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची वाय बी चव्हाण सेंटरवरील अत्यंत महत्त्वाची बैठक संपली काही वेळेपूर्वी संपली. पक्षवाढीसाठी मंत्र्यांची जबाबदारी काय असावी, यावर शरद पवारांनी उपस्थितांना केलं मार्गदर्शन केलं. 

राज्यातील मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी साधारण साडे तीन चार महिन्यांनी शरद पवार बैठक घेत. असतात त्याप्रमाणे आजची बैठक पूर्वनियोजित होती. आजच्या बैठकीत अनिल देशमुख यांच्या गृहमंत्रीपदाबाबत बैठकीत चर्चा झाली नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हंटले. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 

आजच्या बैठकीत काय झाली चर्चा

प्रश्न : मंत्रिमंडळाच्या फेरबदलाच्या चर्चा होतायत, काय सांगाल 

उत्तर : अशा वावड्या बाहेर कितीही उठल्या तरीही अशी कोणतीही चर्चा झालेली नाही 

प्रश्न : गृहविभागाकडून सचिन वाझे प्रकरण योग्यपद्धतीने हाताळलं गेलं आहे का ? 

उत्तर : ज्यावेळी गाडी सापडली त्यावेळी ATS कडे तपास देण्यात आला. ATS कडून तपास सुरु होता. त्यानांतर NIA कडून तपास सुरु झाला. त्यामुळे स्कॉर्पियो स्फोटके प्रकरणाचा तपास NIA करत आहे. त्यानंतर मृत्यूच्या घटनेतील तपास ATS अजूनही करतंय.

प्रश्न : मुंबई पोलिस आयुक्तांचा राजीनामा घेणार का ? 

उत्तर : आमच्या सरकारचं स्पष्ट मत आहे की जर कुणीही दोषी आढळले तर त्याला योग्य ते प्रायश्चित्त घ्यावं लागेल. त्यात कुणाचीही बाजू घेण्याचा प्रश्न येत नाही. 

प्रश्न : गृहविभागाची प्रतिमा मालिन झाली आहे, त्यामुळे त्यावर कारवाई होणार का ? 

उत्तर : हे सर्व प्रकरण, सर्व तपास पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये कुणी जबाबदार आढळलं तर निश्चितपणे सरकार त्यावर कारवाई करेल. 

mumbai news sachin vaze case will anil deshmukh resign information shared by jayant patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com