Mumbai News : शिंदे पिता पुत्र भाजपचे खच्चीकरण करतात - आमदार गणपत गायकवाड

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. पालिका निवडणूकीत आपल्याच पक्षाचे संख्याबळ अधिक असेल असा दावा सत्ताधारी पक्षांकडून केला जात आहे.
ganpat patil
ganpat patilsakal

डोंबिवली - कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांचे सूत जुळण्याचे काही चिन्ह दिसत नाही. केडीएमसी मध्ये भाजपचा महापौर बसेल असे वक्तव्य भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने केले होते. यावर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शिंदे गटा पुढे भाजपचे काही चालत नाही.

यांनी महापौर बसविण्याच्या घोषणा नंतर कराव्यात आधी मानपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणून दाखवावा असे म्हणत भाजपला डिवचले खरे...यावर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मनसेला विरोध न करता त्यांच्या वाक्याला सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून भाजपचे खच्चीकरण केले जात असल्याचा थेट आरोप केला आहे.

ganpat patil
Pune News : अरविंद गोखले आणि चतुरंग प्रतिष्ठानला ‌‘मृत्युंजय प्रतिष्ठान’चा पुरस्कार जाहीर

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट व भाजप पदाधिकाऱ्यांतील वाद दिवसेंदिवस विकोपाला जात आहे. हा वाद अंतर्गतरीत्या धुसफुसत असताना भाजपचे कल्याण पूर्व चे आमदार गणपत गायकवाड यांनी अनेक वेळा जाहीर कार्यक्रमात ही बाब खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. डोंबिवली चे आमदार रविंद्र चव्हाण हे देखील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वर्तणुकीवर नाराज होते.

ganpat patil
Mumbai local News : मुंबईत तब्बल इतक्या ठिकाणी येणार लोकलच्या वेगावर मर्यादा!

डोंबिवलीतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि हा सर्व वाद चव्हाट्यावर आला. या राजकीय घडामोडीचे पडसाद दिल्ली पर्यँत पोहोचले.

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षकांचीबदली न करता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. शिवसेना त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप भाजपकडून केला गेला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत पडदा टाकत हे प्रकरण शांत केले होते.

ganpat patil
Solapur News : खाकी’ वर्दीकडूनच मटका ‘ओपन’; महिन्याला १५ कोटींचा झोलझप्पा

मात्र त्यानंतरही कल्याण पूर्वेतील शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यात सोशल मीडियावर विकास कामाच्या मुद्यावर वाद झालेला पहायला मिळाला होता.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. पालिका निवडणूकीत आपल्याच पक्षाचे संख्याबळ अधिक असेल असा दावा सत्ताधारी पक्षांकडून केला जात आहे. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने पालिका निवडणूकीत भाजपच संख्याबळ अधिक असेल आणि महापौरही भाजपाचा बसेल असे विधान केले होते. यावर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की शिंदे गटापुढे भाजपचे काही चालत नाही.

त्यामुळे शिंदे गट म्हणेल तेच होणार आहे. महापौर यांनी नंतर बसवायच्या वार्ता कराव्यात, आधी मानपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणून बसवावेत. असे म्हणत भाजपला डिवचले होते.

दरम्यान या विधानाला कल्याण पूर्वेचे भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी पाठींबा दर्शवला आहे. आमदार पाटील यांच्या मताशी मी सहमत आहे, असे म्हणत, राज्यात शिंदे पिता - पुत्र आणि शिंदे गटाने भाजप कार्यकर्त्याच खच्चीकरण करण्याचं काम सुरु केले आहे..असा थेट आरोपचं गायकवाड यांनी केला आहे. यावर आता हा वाद कोणत्या थराला जातो हे पहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com