esakal | ऑक्सिजननंतर आता ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा ही तुटवडा

बोलून बातमी शोधा

oxygen concentrator
ऑक्सिजननंतर आता ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा ही तुटवडा
sakal_logo
By
मिलिंद तांबे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने ऑक्सिजनचे संकट तीव्र झाले आहे. राज्यातील बर्‍याच ठिकाणी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची टंचाई आहे. ऑक्सिजन केंद्राचा देखील तुटवडा असल्याने घरगुती ऑक्सिजन सिलेंडर्स रिफिल करणे अवघड झाले आहे. यावर ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर पर्याय म्हणून वापरले जात होते. मात्र त्याचा ही तुटवडा निर्माण झाल्याचे रुग्णांच्या अडचणी वाढल्या आहेत.

वातावरणातील हवेमध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त नायट्रोजन असते. ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर ऑक्सिजन युक्त हवा डिव्हाइसमधून ट्यूबद्वारे रुग्णाला पोहोचते. ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर विजेवर किंवा बॅटरीवर चालतात. ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर हवेतून नायट्रोजन वेगळे करते आणि ऑक्सिजन युक्त गॅस रूग्णांपर्यंत पोहोचवतो. हे मशीन औद्योगिक प्रक्रियेत देखील ऑक्सिजनचा एक स्वस्त स्त्रोत म्हणून वापरला जातो. तेथे हा ऑक्सिजन वायू जनरेटर किंवा ऑक्सिजन जनरेशन प्लांट म्हणून देखील ओळखले जाते.

ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर इतर उपकरणांच्या तुलनेत कमी किंमतीत ऑक्सिजन पुरवठा करण्याचे साधन आहे. क्रायोजेनिक ऑक्सिजन टाक्या किंवा दाबयुक्त सिलेंडर्सच्या तुलनेत हे स्वस्त, अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित आहे. ऑक्सिजन

कॉन्सेन्ट्रेटर ऑक्सिजनचे नवीन रेणू तयार करीत नाहीत, तर हवेतील नायट्रोजन वेगळे करून ऑक्सिजनचा पुरवठा करते. महाराष्ट्राला दररोज 1550 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. 300 ते 350 मे टन ऑक्सिजन राज्याबाहेरून आणला जातो. सातत्याने कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 250 ते 300 मे टन अतिरिक्त साठा उपलब्ध असणं गरजेचं बनले आहे.

हेही वाचा: राज्यातील बार नुतनीकरण रेंगाळत, अद्याप कोणताही निर्णय नाही

फिलिप्स आणि बीपीएल या दोन कंपन्या

ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरची निर्मिती करणाऱ्या दोन प्रमुख कंपन्या आहेत. मात्र सध्या या कंपन्यांकडे देखील स्टॉक उपलब्ध नाही. शिवाय पुढील 15 दिवस नवीन पुरवठा होण्याची अपेक्षा नाही. सध्या 1 लाखांची मागणी नोंदवण्यात आली असून नवीन मशीन आले तर ते रातोरात संपेल असे ऑल फूड अँड ड्रग्स लायसेन्स होल्डर फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले.

ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर ही पोर्टेबल मशीन असून ज्याच्या मदतीने रूग्णांसाठी घरातील हवेचा वापर करून ऑक्सिजन तयार केला जाऊ शकतो. ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर प्रेशर स्विंग एब्जॉर्प्शन टेक्नोलॉजीचा वापर करतो. घरी किंवा छोट्या क्लिनिकमध्ये ऑक्सिजन सिलेंडर किंवा दाबयुक्त ऑक्सिजन वापरणे धोकादायक किंवा गैरसोयीचे असेल अशा ठिकाणी ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर अधिक वापरली जातात. ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरची किंमत 40 हजारांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे.

------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai news shortage of oxygen concentrator after oxygen