दहावी पेपर फुटीप्रकरणी शिक्षकासह तिघे तुरुंगात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

मुंबई - दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी 11 जणांना आंबोली पोलिसांच्या विशेष पथकाने गजाआड केले. अन्वरअल हसन शेख, इम्रान शेख, फिरोज अब्दुल माजिद खान अशी त्यापैकी तिघांची नावे आहेत. आरोपी नागपाडा व अंबरनाथ परिसरातील रहिवासी आहेत. न्यायालयाने तिघांनाही पोलिस कोठडी सुनावली आहे; तर इतर आठ अल्पवयीन मुलांची रवानगी डोंगरीच्या बालसुधारगृहात केली आहे.

तक्रारदार शिक्षिका अंधेरी येथील शाळेत शिकवतात. सोमवारी हिस्टरी पॉलिटिकल सायन्स-1 चा पेपर होता. सकाळी साडेदहाच्या सुमारास तीन विद्यार्थी मोबाईल व पुस्तकात काहीतरी पाहत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी इतर शिक्षकांच्या मदतीने तिन्ही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मोबाईलची पाहणी केल्यावर त्यात त्या दिवसाचा हिस्टरी पॉलिटिकल सायन्सचा पेपर असल्याचे स्पष्ट झाले. तिन्ही मुलांकडील मोबाईल शिक्षकांनी ताब्यात घेतले. या पेपर फुटीप्रकरणी शालेय शिक्षण विभागाने आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पेपर हा इन्स्टाग्राम या सोशल साइटवर लीक झाल्याचे तपासात उघड झाले.

तपासादरम्यान पोलिसांनी आठ विद्यार्थ्यांना चौकशीकरिता ताब्यात घेतले. उपनिरीक्षक दया नायक यांच्या पथकाने पेपर फोडणाऱ्या तिघांना अंबरनाथ व नागपाडा परिसरातून ताब्यात घेतले. फिरोज हा खासगी शिकवणी घेतो. त्याने हा पेपर विद्यार्थ्यांना दिल्याचे तपासात उघड झाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news ssc paper leakage case teacher crime