Mumbai News : पाकिस्तान अन् चीनमध्ये प्रशिक्षित व्यक्तीची मुंबईत एन्ट्री; यंत्रणा सतर्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Police

Mumbai News : पाकिस्तान अन् चीनमध्ये प्रशिक्षित व्यक्तीची मुंबईत एन्ट्री; यंत्रणा सतर्क

NIA Email To Mumbai Police : पाकिस्तान. चीन आणि हाँगकाँगमध्ये प्रशिक्षण घेतलेली संशयास्पद व्यक्तीचा मुंबई वावर असल्याचे सांगितले जात आहे. NIA ला याबाबत ई-मेल प्राप्त झाला आहे.

हेही वाचा : डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबई पोलिसांना सतर्क केले आहे. यानंतर मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्था अधिक चोख करण्यात आली आहे.

संशयास्पद व्यक्ती मुंबईत दाखल झाल्याची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली असून, सरफराज असे मुंबईत दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या माहितीनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा देखील (NIA) सतर्क झाली आहे.

सरफराज इंदूरचा रहिवाशी असून त्याने चीन, पाकिस्तान आणि हाँगकाँग येथे प्रशिक्षण घेतलं असून तो भारतासाठी संशयास्पद असल्याचा उल्लेख प्राप्त ई-मेलमध्ये करण्यात आला आहे.

याशिवाय संशयिताचे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि एलसी कॉपी मेलमध्ये जोडलेले आहे.

NIA च्या या माहितीनंतर मुंबई पोलीस सर्तक झाले असून, या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. तसेच मुंबई पोलिसांनी इंदूर पोलिसांशी देखील संपर्क साधला आहे.

रविवारी दुपारच्या सुमारास NIA च्या मुंबई कार्यालयातील ईमेल आयडीवर हा ई-मेल मिळाला आहे.