वीज कापल्यानंतर शेजाऱ्याकडून वीज घेणे घेणाऱ्याला आणि शेजाऱ्यांना पडलं महागात, तुम्हीही असं काही केलं नाहीये ना ?  

वीज कापल्यानंतर शेजाऱ्याकडून वीज घेणे घेणाऱ्याला आणि शेजाऱ्यांना पडलं महागात, तुम्हीही असं काही केलं नाहीये ना ?  
Updated on

नवी मुंबई : महावितरणने वीजजोडणी कापल्यानंतर शेजाऱ्याकडून वीज घेणे घेणाऱ्याला आणि शेजाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी महावितरणने वीज शेजाऱ्यांना देणाऱ्याला आणि शेजारी असे दोघांवर वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांनाही 11 हजार रूपयांचा दंड भरावा लागला आहे. महावितरणच्या कारवाईमुळे वीज चोर व थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. 

राज्यभरातील वीज बील थकबाकीदारांवर महावितरणने वीज खंडीत करण्याची कारवाई सुरू केली आहे. वाशी मंडळाच्या अंतर्गत अधिक्षक अभियंता राजाराम माने यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई, पनवेल व उरण तालुक्‍यातील थकबाकीदारांवर जोरदार कारवाई सुरू आहे.

वारंवार सांगूनही वीज बील अदा न करणाऱ्यांच्या वीज जोडण्या खंडीत केल्या जात आहेत. अशा प्रकारे उरण शहरातील कोटनाका परिसरात राहणाऱ्या शंकर ठाकूर यांनी 41 हजार 690 रूपयांचे वीज बील न भरल्यामुळे महावितरणने 15 फेब्रुवारीला त्यांची वीज खंडीत केली होती. मात्र ठाकूर यांनी शेजारी राहणाऱ्या दत्तात्रय ठाकूर यांच्या घरातून परस्पर वीज घेऊन घरातील उपकरणे गेले महिनाभर वापरत होते. ही बाब महावितरण अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ठाकूर यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता ही बेकायदेशीर वीज पुरवठा व वीजेचा वापर सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली.

या गंभीर घटनेची नोंद घेत महावितरणतर्फे उरण पोलिस ठाण्यात वीज देणारे दत्तात्रय ठाकूर आणि वीज वापरणारे शंकर ठाकूर यांच्यावर विद्युत अधिनियम 2003 अन्वये अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे. शंकर ठाकूर यांनी एक महिना बेकायदेशिर वीजेचा वापर केल्यामुळे त्यांच्यावर महावितरणने 5 हजार 500 रूपयांचा दंड आकारला आहे. तर वीज पुरवठा केल्याप्रकरणी दत्तात्रय ठाकूर यांच्यावरही महावितरणने 5 हजार 500 रूपयांचा दंड ठोठावला आहे. महावितरणने कारवाई केल्यानंतर शंकर ठाकूर यांनी त्यांची 41 हजार 690 रुपयांचे थकवलेले वीज बील अदा केले आहे. 

महत्त्वाची बातमी :  देशाची आर्थिक राजधानी 'मुंबई'त लॉकडाऊन लागणार का ? राजेश टोपेंनी केलं स्पष्ट

उरणमध्ये 15 कोटी 82 लाख रुपयांची थकबाकी 

महावितरणच्या उरण उपविभागामध्ये घरगुती, वाणिज्य व औद्योगिक तसेच इतर अशा एकूण 11 हजार 518 ग्राहकांकडे 6 कोटी 61 लाख रुपयांची थकबाकी आहे. 136 सार्वजनिक दिवाबत्तीची 8 कोटी 44 लाख व 33 पाणी पुरवठा ग्राहकांकडे 76 लाख रूपये असे एकूण 15 कोटी 82 लाख रूपये थकवलेले आहेत. ही संबंधित थकबाकी वसूल करण्यासाठी पथदिवे व पाणी जोडण्यांची वीज खंडीत केली जाणार असल्याचा इशारा अधिक्षक अभियंता राजाराम माने यांनी केला आहे.  

mumbai news temporary electricity power cut for not paying bills in lockdown special news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com