तरूण मुलांमध्ये वाढल्या अंडाकोषातील (टेस्टिक्युलर) तीव्र वेदनेच्या घटना, वेळीच उपचार न मिळाल्यास वंध्यत्वाची भीती

तरूण मुलांमध्ये वाढल्या अंडाकोषातील (टेस्टिक्युलर) तीव्र वेदनेच्या घटना, वेळीच उपचार न मिळाल्यास वंध्यत्वाची भीती
Updated on

मुंबई, 16: तरूण मुलांमध्ये अंडाकोषात (टेस्टिक्युलर) तीव्र वेदना होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातून, या आजारावर वेळीच उपचार न मिळाल्यास मुलांमध्ये वंध्यत्वाची भीती निर्माण झाली असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. शिवाय या आजाराबाबत तरुणांमध्ये जागरूकता कमी असून याविषयी आज ही डाॅक्टरांशी खुलेपणाने बोलले जात नसल्याचे डाॅक्टर्स सांगतात. 

मुंबईतील एका 15 वर्षीय मुलावर यशस्वी उपचार करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. विहान सिंग (नाव बदललेलं) हा चेंबूरमध्ये राहणारा आहे. तो इयत्ता 9 वीमध्ये शिकतोय. गेल्या दोन दिवसांपासून अचानक त्यांच्या अंडकोषाच्या उजव्या वृषणमध्ये तीव्र वेदना जाणवत होती. या मुलाने याबाबतीत आईवडीलांना सांगितले. घरगुती उपचार करून वेदना कमी होईल, असे पालकांना वाटले. परंतु, काही दिवसांनी मुलाला वेदना असह्य होऊ लागली. मुलाची प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात आल्याने कुटुंबियांनी त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले. 

अंडाकोषातील वेदना सामान्य नाही - 

लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. विशाखा कालीकर यांनी सांगितले की, अंडकोषात होणारी ही वेदना अतिशय गंभीर आहे. पुरूषांच्या अंडकोषाचे मुख्य कार्य शुक्राणुंचे उत्पादन आणि हार्मोन टेस्टोस्टेरॉन तयार करण्याचे काम करते. दुखापत, संसर्ग, मंज्जातंतू नुकसान, कर्करोग आणि इजा यांसारख्या विविध कारणांमुळे हा त्रास उद्भवू शकतो. तरूण मुले आणि पुरूषांमध्ये अंडकोषात वेदना ही अतिशय तीव्र स्वरूपाची असते. अंडकोषातील वेदना कधीच सामान्य नसते. बहुतेक प्रकरणांमध्ये दुखापत झाल्याने वेदना सुरू होते. मुख्यतः तरूण मुलांमध्ये ही समस्या मोठ्याप्रमाणात दिसून येते.

या दुखण्यावर योग्य वेळी उपचार न मिळाल्यास अंडकोषाचे नुकसान होऊ शकते. ज्यामुळे अनेकांना वंध्यत्वाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे अंडकोषातील दुखण्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये आणि तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय पालकांनी महिन्यातून एकदा तरी त्यांच्या मुलाची अंडकोषाची (टेस्टिक्युअर) तपासणी करून घेणं गरजेचं आहे. जेणेकरून वेळीच निदान झाल्यास रूग्णावर तातडीने उपचार करणं सहज सोपं होतं.’’ 

जागरुकता कमी - 

या आजाराविषयी तरुणांमध्ये जागरुकतेचा अभाव असून डॉक्टरांशो ही खुलेपणाने बोलले जात नाही. आई वडील मुलांना घेऊन येतात, तेव्हा ही मुलं आपल्या या समस्येविषयी आम्हाला सांगत नाहीत. मात्र याचे प्रमाण नक्कीच जास्त आहे असे ही डाॅ. कालीकर यांनी स्पष्ट केले आहे.

mumbai news testicular pain increasing in teenage boys may lead to infertility

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com