टिटवाळ्यात साकारणार पुरातन वस्तूंचे संग्रहालय

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

टिटवाळा : भारतीय संस्कृती चा पुरातन वारसा फार मोठा आहे, त्यातच  महाराष्ट्राला हा वारसा म्हणजे मोठं लेन च आहे. त्यामुळे येथील पुरातन वस्तूंना विशेष महत्व आहे. परंतु जतना अभावी काही ऐतिहासिक वैभव नासधुस होण्याच्या मार्गावर असतांना कल्याण, मुरबाड तालुक्यातील काही होतकरू तरुण गेले अनेक वर्षांपासून ऐतिहासिक वस्तूंचे जतन करन्यायासाठी धडपडत  आहेत. 

त्यांनी अनेक वर्षे  जिद्दीने आणि प्रचंड मेहनतीने जतन केलेल्या वस्तूंना अखेर कायमचे संग्रलाय  मिळणार आहे. आपल्या या ऐतिहासिक वस्तूंना प्रकाश झोतात आणण्यासाठी रायते येथील अश्वमेध प्रतिष्ठानला केलेले प्रयत्न.फलदायी ठरणार आहेत, कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील टिटवाळा येथे या संग्रहालयासाठी आता जागा उपलब्ध झाली असून सिद्धिविनायक मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या उमादीप इमारतीत पालिकेच्या आरक्षित जागेत हे  संग्रहालय उभारले जाणार  आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका पुरस्कृत 'उल्हास संग्रहालय व संशोधन केंद्र' असं या संग्रहालयाचं नाव असणार आहे. 

पद्मश्री डॉ. सदाशिव गोरक्षकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना मूर्त रूप धारण करणार आहे. नदी खोरे अनुषंगाने हे भारतातील पहिले व ठाणे जिल्ह्यातील एकमेव सार्वजनिक संग्रहालय इतिहास प्रेमींना टिटवाळ्यात पाहायला मिळणार आहे. मात्र आधीच प्रसिद्ध असलेलं सिद्धिविनायक मंदिरानंतर आता हे उल्हास संग्रहालय व संशोधन केंद्र पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल. 'संग्रहालयाचं काही काम शिल्लक असल्याने लवकरच यावास्तुच्या उद्धघाटनाची तारीख जाहीर केली जाईल,' असं अश्वमेध प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले. प्राचीन शस्त्रास्त्रे, प्राचीन नाणी, दिवे, दगडी वस्तू, वजनं व मापं, जुनी कागदपत्रे,  देवपूजेतील  वस्तू अशा अनेक पुरातन वस्तू तसेच जैवविविधता दालन या संग्रहालयात पहायला मिळणार आहे. 

या संग्रलयात  पुरातन वस्तू संवर्धनासाठी  जमा केल्यास ती वस्तू संबंधितांच्या नावासाहित जतन काली  जाईल, असे आवाहन संग्रहालया तर्फे करण्यात आले . त्, अविनाश हरड-यांनी केले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com