विक्रोळी महोत्सवाला वाढता विरोध; पालिकेवर संतापले स्थानिक

अक्षय गायकवाड
शनिवार, 10 मार्च 2018

या मैदानाच्या बाजूच्या परिसरात लोकवस्ती आहे. 10 वी 12 च्या परीक्षाकाळात कार्यक्रमना विरोध झाला पाहिजे. जरी कार्यक्रम हा 5.30 चा नंतर सुरू होणार असला तरी त्याचा त्रास स्थानिकांना होणार आहे. या मैदानात कार्यक्रम घेतले जाऊ नये या विषयावर सह्याची मोहीम घेण्यात येतील. शिक्षकमंत्री विनोद तावडे यांनाही पत्रव्यवहार करणार आहोत.
- प्रीतम साबळे, शाखाध्यक्ष, मनविसे

विक्रोळी (मुंबई): महापालिकेने परवानगी दिलेल्या विक्रोळी महोत्सवावरून वाद निर्माण झाला आहे. या महोत्सवामुळे येथील रहिवासी वस्तीत शांततेचा भंग तसेच दहावी-बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना त्रास होत असल्याने स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. टागोर नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर सुन्नी बिसस्मिल्लाह रजा कमिटीच्या विक्रोळी महोत्सवाला 6 मार्चपासून सुरुवात झाली. तर याबाबतचे कामकाज 3 मार्च पासून प्रत्यक्ष मैदानावर सुरू झाले. महोत्सव 13 मार्चपर्यंत सुरू असणार आहे. त्यामुळे 11 दिवस आम्हाला त्रास सहन करावा लागत आहे, अशी नाराजी रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

मैदानाच्या आजूबाजूला 500 बैठी घर आहेत. यामुळे येथील नागरिकांना या महोत्सवामुळे वाहतूक कोंडीला ही सामोरे जावे लागत आहे. परीक्षा असताना महोत्सवाची परवानगी दिली कशी ? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते चेतन अहिरे यांनी केला आहे.

कर्णकर्कश जनरेटरचा
आवाज,वायू, धुळ यांचे प्रदुषण व खेळणी, येणाऱ्या लोकांचा गोंगाट यांचा ञास स्थानिक वृध्द व महिला व रहिवाशांना होत आहे. आवाजामुळे अभ्यास करण्यास अडचणी येत आहेत शकतात. काही दिवसांपूर्वीही कन्नमवार नगर येथे रवींद्र म्हात्रे मैदानात कोकण महोत्सव भरवण्यात आला होता तिथेही आयोजकाडून नियमाचे उल्लंघन करण्यात आले होते. असा आरोपही अहिरे यांनी केला आहे. याबाबत पालिकेविरोधात आंदोलन करणार असा इशारा अहिरे यांनी दिला आहे. एस वॉर्डचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांना फोन करूनही आणि संदेश पाठवुनही त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. "पालिकेने आयोजकाकडून आगाऊ रक्कम घेतली आहे जर त्यांनी कोणतेही नियम तोडले तर त्या रकमेमधून वजा केली जाणार आहे, " असे उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत आयोजकाशी संपर्क होऊ शकला नाही.
 
शिवसेनेच्या फलकाचा वापर मनसेचा विरोध

कार्यक्रमाला विरोध नको म्हणून महोत्सव आयोजकांनी शिवसेनेचा नावाचा वापर करत त्यांच्या नावाने विक्रोळी महोत्सवचे टागोर नगर विभागात फलक जागोजागी लावले आहेत . याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आमचा या कार्यक्रमाशी काही संबंध नाही. या कार्यक्रम सामाजिक असल्यामुळे आम्ही याना सहकार्य केले पण हा कार्यक्रम परीक्षा दरम्यान असेल याची माहिती नव्हती. हा सेनेचा कार्यक्रम नाही. स्थानिकांचा विरोध असेल तर कारवाई झालीच पाहिजे. आमचा विरोध हा कार्यक्रमला नसून पालिकेविरोधात आहे. दहावी बारावीची परीक्षा असताना परवानगी दिलीच कशी विद्यार्थ्यांना त्रास झाला याचा जवाबदार कोण असे मनसेचे शाखाध्यक्ष संतोष देसाई यांनी सांगितले.

मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात नियमाचे पालन होत नाहीत. या अगोदर ही या मैदानावर आणि रवींद्र म्हात्रे मैदानावर झालेल्या कार्यक्रमाबाबत नियमाचे उल्लंघन झाल्याची तक्रार केली आहे पण कारवाईला गती नाही. परीक्षा काळात परवानगी देताना विचारविनिमय झाला पाहिजे होता.
- चेतन अहिरे, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: mumbai news vikroli mahotsav 2018 student examination