मुंबईकरांनो धोक्याची घंटा ! पश्चिम उपनगरात कोरोनामध्ये 32 टक्क्यांची वाढ

मुंबईकरांनो धोक्याची घंटा ! पश्चिम उपनगरात कोरोनामध्ये 32 टक्क्यांची वाढ

मुंबई, ता. 6 : कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. नव्या रुग्णांची बहुतांश संख्या ही पश्चिम उपनगरांमध्ये असून ही वाढ इमारतींमधील अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्चिम उपनगरातील बोरिवली-विलेपार्ले पट्ट्यातील तब्बल पाच विभागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पश्चिम उपनगरातील बोरिवली-विलेपार्ले पट्ट्यातील तब्बल पाच वॉर्डमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहराच्या एकूण सक्रिय प्रकरणांपैकी 32 टक्के कोविडचे रुग्ण या भागात सापडत आहेत. म्हणून हे भाग हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहेत.

मुंबई महानगरपालिकेनं 5 मार्चपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत एकूण 10 हजार 452 रुग्ण सक्रिय आहेत. 24 प्रशासकीय प्रभागांपैकी बोरिवली, गोराई आणि मागाठाणे या क्षेत्रांचा समावेश असलेल्या आर मध्य विभागात 752 सक्रिय रुग्णांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर के पाश्चिम मध्ये अंधेरी वेस्ट, विलेपार्ले वेस्ट आणि जुहूमध्ये 714 रुग्ण आहेत. पहिल्या पाच यादीत आर दक्षिण (कांदिवली, चारकोप, पोयसर) मधील 643, पी-उत्तर (मालाड पूर्व आणि पश्चिम) 634 आणि के पूर्व (अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी ई) 631 अशा 5 प्रभागांचा समावेश आहे.

याउलट दक्षिण मुंबई भागातील प्रभागात बी (डोंगरी), सी (काळबादेवी, भुलेश्वर आणि मरीन लाइन्स) आणि ए (चर्चगेट, कुलाबा, कफ परेड आणि नरिमन पॉईंट) मध्ये सक्रिय कोरोना संसर्गाचा प्रकरणे सर्वात कमी आहेत. बी प्रभागात 75 सक्रिय प्रकरणं आहेत, सी प्रभागात 136 आणि ए  251 यांचा समावेश आहे.

तथापि, मार्च पहिल्या आठवड्यात ए  विभागातील कोलाबा, कफ परेड आणि चर्चगेट या भागांमध्ये कोविड घटनांमध्ये 91 टक्के वाढ झाली. आर-उत्तर (दहिसर आणि बोरिवली) मध्ये 50 टक्के, ई (भायखळा आणि मुंबई मध्य) 58 टक्के, एफ-दक्षिण (परळ आणि शिवडी) 52 टक्के आणि एम- पूर्व (गोवंडी) 51 टक्के नोंद झाली आहे.

वाढत्या नव्या रुग्णांमुळे रुग्ण दुपटीचा दर ही कमी कमी होऊ लागला आहे. मार्चच्या पाहिल्या आठवड्यात विभाग टी, के पश्चिम, एम पश्चिम, एच पश्चिम, एफ उत्तर यांतील रुग्ण दुपटीचा  कालावधी हा 193 दिवसांपर्यंत खाली आला आहे. 

नव्या रुग्णांची अधिकतर संख्या ही इमारती भागांमध्ये अधिक आहे. मुंबईत 4 मार्च पर्यंत 188 इमारती सील केल्या आहेत.त्यात मुंबईतील 41 हजार घरांचा समावेश असून 1 लाख 55 हजार लोकसंख्येचा समावेश आहे. 

महत्त्वाची बातमी : Income Tax Raid : सात बँक लॉकर्स जप्त, ईमेल्सची तपासणी.. वाचा धाडसत्रातील १० महत्त्वाचे मुद्दे

अनेक इमारतींमध्ये कौटुंबिक सोहळे वाढल्याचे दिसते. लग्न,वाढदिवस सोहळ्यांमध्ये लोकं मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. ठराविक विभागात रुग्ण का वाढत आहेत याची चौकशी करण्याचे निर्देश सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. नव्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचण्यांची संख्या ही वाढवण्यात आली आहे. त्यामुळेही रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत असून यापैकी बहुतांश घटना इमारती भागातील असल्याचे दिसत आहे असं मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणालेत. 

mumbai news western suburbs are becoming new covid hotspots patient count increased by 32 percent

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com