मुंबईतील युरेनियम साठा प्रकरणाचा तपास NIA कडे

मुंबईतील युरेनियम साठा प्रकरणाचा तपास NIA कडे

महाराष्ट्र ATS ने सुमारे 21 कोटींचे 7 किलो युरेनियम केले होते जप्त
Published on
Summary

महाराष्ट्र ATS ने सुमारे 21 कोटींचे 7 किलो युरेनियम केले होते जप्त

मुंबई: महाराष्ट्र ATS ने अणूबॉम्ब (Atom Bomb) निर्माण करण्यासाठी लागणारे सात किलो युरेनियम (Uranium) जप्त केले होते. या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजे NIAने स्वत:कडे घेतला आहे. ATS ने कारवाई करून 21 कोटी 30 लाखांच्या युरेनियमसह दोघांना अटक केली होती. युरेनियम विक्रीसाठी ग्राहक शोधत असणाऱ्या दोघांना ATS च्या पथकाने सापळा (Trap) रचून अटक केली. ATSने या प्रकरणात दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होती. अटक केलेल्यामध्ये जिगर पांड्या (27) (Jigar Pandya) आणि अबू ताहीर (Abu Tahir) (31) यांचा समावेश आहे. ATSने या प्रकरणात अ‍ॅटोमिक एनर्जी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणाचा तपास NIAने आपल्याकडे घेतला आहे. (Mumbai NIA takes over probe into seizure of natural uranium worth Rupees 21 crore)

तो धातू युरेनियम आहे हे कसं कळलं?

जिगर पांड्या आयटी कंपनीत काम करतो. तर अबू ताहिर इंपोर्ट-एक्सपोर्टचं काम करतो. दोघांनीही एमबीए केले आहे. ताहिरच्या वडिलांचा गोवंडी येथे भंगारचा व्यवसाय होता. 5 ते 6 वर्षापूर्वी त्याच्याकडे भंगार घेऊन एक ट्रक आला होता. त्यात त्यांना हे युरेनियम आढळले. युनिक पदार्थ असल्याने त्यांनी तो कपाटात ठेवला होता. मात्र ते युरेनियम आहे. याची त्यांना कल्पना नव्हती. अबूला जेव्हा हा तुकडा फेब्रुवारी 2021 मध्ये दिसला, त्यावेळी त्याने लॉकाडऊनमध्ये सोशल मिडियावर या धातूबाबत चौकशी केली. तसेच त्याचा मित्र जिगर हा आयटी कंपनीत असून तो अशा खासगी लॅबच्या मालकांच्या संपर्कात असल्याने अबूने त्याला या धातूचा एक तुकडा तपासणीसाठी दिला. तपासणीत हे युरेनियम आहे हे लक्षात आले.

मुंबईतील युरेनियम साठा प्रकरणाचा तपास NIA कडे
"शरद पवारांशी चर्चा झाली. लवकरच..."; संजय राऊतांचे सूचक विधान

युरेनियम कसं सापडलं?

ते युरेनियमच आहे हे समजल्यानंतर जिगरने हे युरेनियम 25 कोटींना विकायला काढले. याची माहिती ATSला फेब्रुवारीत मिळाली. या माहितीच्या आधारे ATS मधील एक अधिकारी गुजराती व्यावसायिक बनून गेला. त्याने त्याच्या लेसर मशिनचा व्यवसाय असल्याचं सांगितले. ATSने तो धातू भाभा ऑटोमिक सेंटर येथे तपासणीसाठी पाठवला. दोन महिन्यानंतर युरेनियमचा अहवाल आला. तो पर्यंत ATSने या दोघांवर पाळत ठेवली होती. त्यात हा धातू नैसर्गिक असून मनुष्यजीवास हानीकारक असल्याचं म्हटले होते. त्यानुसार ATSने याची कल्पना ऑटोमिक मिनिरल्स डायरेक्टर फॉर एक्सप्लोरेशन अँड रिसर्च, अँटोमिक एनर्जी विभाग नागपूर यांना कळवले. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवून ATSने या दोघांना अटक केली. सध्या दोघेही 12 मे पर्यंत पोलिस कोठडीत आहेत. आता दोघांचाही ताबा व तपासाची कागदपत्रे NIA ताब्यात घेईल. याबाबतचे आदेश केंद्रीय गृहविभागाकडून जारी करण्यात आले आहेत.

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com