"शरद पवारांशी चर्चा झाली. लवकरच..."; संजय राऊतांचे सूचक विधान

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी साधला संवाद
Sharad-Pawar-Sanjay-Raut
Sharad-Pawar-Sanjay-Raut
Summary

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सूचक इशारा

मुंबई: सध्याचं वातावरण हे चिंता व्यक्त करावी असंच आहे. कांग्रेसच्या (Congress) नेतृत्वाखाली सध्या राष्ट्रीय आघाडी (UPA) आहे. पण जेव्हा निवडणुकांमध्ये कांग्रेसला अपयश येतं, तेव्हा चिंता वाटते. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) ममतांनी जी (Mamta Banerjee) मुसंडी मारली ती जबरदस्त आहे. पण भविष्यात देशात अशी आघाडी निर्माण व्हावी, ही सगळ्यांचीच इच्छा. या आघाडीचा आत्मा हा कांग्रेस पक्ष आहे. आसाममध्ये कांग्रेसला चांगलं यश मिळालं. पण कांग्रेसने मुसंडी मारणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत कालच माझी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा झाली. लवकरच नव्या हालचाली सुरू होतील, असा सूचक इशारा शिवसेना (Shivsena) खासदार आणि महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला. (Shivsena MP Sanjay Raut says Meetings done with NCP Chief Sharad Pawar for New Beginning)

Sharad-Pawar-Sanjay-Raut
"शिवसेनेचा संगत-गुण राष्ट्रवादीला लागला की काय..."

"राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधात जर आघाडी तयार करायची असेल तर सर्व पक्षांनी एकत्र यावं लागेल. या आघाडीचं नेतृत्व कोणी करावं याबद्दल मी काहीही बोललेलो नाही. हे एकत्र बसूनच ठरवावं लागेल. राज्यात भिन्न विचारधारेचे सरकार आहे. तरीही त्यांनी आदर्श सरकार निर्माण केलं आहे. असंच देशात व्हावं ही साऱ्यांची इच्छा आहे", असे राऊत म्हणाले.

Sharad-Pawar-Sanjay-Raut
माणूसकीला काळीमा!! मुंबईत रूग्णाला चक्क फूटपाथवर फेकलं...

"महाराष्ट्र मॉडेलबद्दल पंतप्रधान मोदी स्वत: बोलतात. राज्याने स्वत:ची लढाई स्वबळावर निर्माण केली. यात श्रेय सगळ्यांचं आहे. इतर राज्यात सेनेसारखं काम इतर पक्षांना करता आलेलं नाही. राज्यात देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत त्यामुळे टीका करणं हा त्यांच्या कामाचा भागच आहे. पण त्यांच्या प्रश्नांना नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं आहे. आम्हाला वेगळं उत्तर देण्याची गरज नाही", अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.

मातृदिनाचे औचित्य साधून त्यांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. "माझ्या आईचा माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचा वाटा आहे. माझ्यासारख्या माणसाला शिस्त लावण्यात आईचा मोठा वाटा आहे", असं राऊत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com