मुंबई : महानगर पालिकेने पाठवलेल्या मालमत्ता करांच्या बिलावर आक्षेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

मुंबई : महानगर पालिकेने पाठवलेल्या मालमत्ता करांच्या बिलावर आक्षेप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महानगर पालिकेने पाठवलेल्या मालमत्ता करांच्या बिलावर काही आक्षेप असल्याने ते लेखी नोंदविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. हे आक्षेप 14 डिसेंबर पर्यंत पाठवायचे असून त्यानंतर आलेल्या आक्षेपांची दखल घेतली जाणार नाही. टपालानेही मुदतीनंतर आक्षेप प्राप्त झाल्यास त्याची दखल घेण्यात येणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महानगर पालिकेने सप्टेंबर पासून मालमत्ता कराची बिले पाठविण्यास सुरवात केली आहे.तसेच,ही बिले ऑनलाईनही पाहाता येतात.त्यातून 1200 कोटीं पेक्षा अधिकची वसुलीही झाली आहे. तर,या आर्थिक वर्षात 5 हजार कोटीहून अधिकची वसुली करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.मात्र,अनेक वेळा पालिकेने पाठवलेल्या बिलावर आक्षेप घेतला जातो.अशा करदात्यांना आक्षेप घेण्यासाठी महानगर पालिकेने 14 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. संबंधीत करदात्याने अथवा त्याने मुखत्यारपत्र दिलेल्या व्यक्तीने या हरकती नोंदविणे बंधनकारक आहे.त्याच बरोबर सुनावणीच्या वेळी पोहचपावतीही सादर करायची आहे.

हेही वाचा: "दहशतवाद्यांनी केलं ते चुक आणि आर्मीनं केलेलं बरोबर कसं?"

टपालाने पाठविण्यात आलेले अर्ज 20 डिसेंबर नंतर पालिकेला मिळाल्यास त्याची दखल घेतली जाणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले.

येथे द्या हरकती

- करनिर्धारण व संकलन खाते

महानगर पालिका मुद्रणालय

3रा मजला,546,ना.म.जोशी मार्ग

भायखळा पश्‍चिम

मुंबई 400011

loading image
go to top