मुंबई : 29 ऑक्टोबर जागतिक पक्षाघात दिन

112 लोकांचा वाचला जीव, सुवर्णकाळात वाचवले इंजेक्शन देऊन वाचवले डॉक्टरांनी प्राण
Mumbai
MumbaiSakal

मुंबई : मुंबईतील अँटॉप हिल या परिसरात राहणारे 31 वर्षीय राकेश थोरात यांना 25 किलोची लादी उचलता उचलता अचानकच डोळ्यांवर अंधारी आली. हळूहळू बोलण्यात अडथळा निर्माण झाला. त्यानंतर डावा हात लूळा पडला. ही लक्षणे नेमकी कशाची हे समजणे त्यांच्यासाठी कठीण होते. पण, त्यांच्या भावाने तात्काळ राकेशला पक्षाघात आल्याच्या अर्ध्या तासानंतर केईएम रुग्णालयाच्या आपातकालीन विभागात दाखल केले. आपातकालीन विभागाने संबंधित डॉक्टरांशी संपर्क केला. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गरजेनुसार सिटीस्कॅनकरुन तात्काळ डॉक्टरांनी राकेशला एक्टीलाइज इंजेक्शन दिले.  काही तासांतच राकेश आपल्या पायावर उभे राहून चालू लागले होते.

राकेश सारखे केईएम रुग्णालयाने आतापर्यंत 112 रुग्णांना इंजेक्शन दिले आहे. हे सर्व रुग्ण रुग्णालयात साडे चार तासांच्या सुवर्णकाळात पोहोचले होते. म्हणून त्यांच्यावर यशस्वी उपचार करणे आणि त्यांचे जीवन पूर्वपदावर आणण्यात डॉक्टरांना यश आले.

केईएम रुग्णालयाच्या न्यूरोलॉजी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 112 रुग्णांपैकी 70 रुग्णांना 24 तासांच्या आत इंजेक्शन दिल्याचा फायदा झाला. या आकडेवारीनुसार, जवळपास 65.42 टक्के रुग्णांना काही तासांतच बरे वाटल्याचे निदर्शन विभागाने मांडले आहे. तर, या रुग्णांमध्ये वास्तविक सुधारणेसाठी किमान 3 ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो असे केईएम रुग्णालयातील न्यूरोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.

Mumbai
मुस्लीम समाज कृती समिती कडून बांग्लादेश येथील हिंदूवर झालेल्या हल्ल्याचा निषेध

इंजेक्शन देण्यातही अडथळे -

मुंबईच्या परळ येथील केईएम रुग्णालयात पक्षाघात, प्यारालेसीस , लकवा रुग्ण यांच्यासाठी 2018 साली ब्रेन स्ट्रोक युनिट सुरु झाले आहे. आता हा विभाग आणखी सक्षम झाला असून 24 तास उपचार केले जात आहेत. पण, या विषयी अजूनही लोकांमध्ये जागरुकतेचा अभाव असल्याने या सुविधेचा फायदा घेतला जात नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, साडे चार तासांच्या आत आलेल्या रुग्णाला याआधी रुग्णालयातर्फे तात्काळ इंजेक्शन दिले जायचे. या एका इंजेक्शनची किंमत जवळपास 50 हजार आहे. पण, सर्व सामान्यांना हे इंजेक्शन परवडेलच असे नाही. त्यामुळे, अनेकदा इंजेक्शन लावलेल्या रुग्णाचे नातेवाईक पैसे भरण्यास काचकूच करतात. शिवाय, इंजेक्शनच्या बदल्यात इंजेक्शनही आणून देत नाहीत. मग, जेव्हा जेव्हा ते रुग्ण फॉलोअपसाठी येतात तेव्हा किंवा न येणाऱ्या रुग्णांना तिथल्या डॉक्टरांना त्यांना फोनवरुन पैसे किंवा इंजेक्शन परत करा असे सांगावे लागते अशी समस्या येत असल्याचे डॉ. रावत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

Mumbai
तुम्ही चिरकत रहा..; उद्धवजींमध्ये राहुलजी आम्हाला स्पष्टपणे दिसू लागलेत

न परवडणारे इंजेक्शन -

पालिकेच्या केईएम रुग्णालयात इंजेक्शन देण्याची सुविधा जरी सुरु झाली असली तरी ते इंजेक्शन सर्वसामान्याच्या खिशाला मोठी कात्री लावणारे आहे. एका वेळेस 50 हजार खर्च केल्यानंतर इतर खर्च रुग्णांना परवडन नाही. हे इंजेक्शन सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. शिवाय, भारतातील अनेक रुग्णालयातही ते मोफत रुग्णांना दिले जाते. पण, मुंबईतील पालिका रुग्णालयात हे मोफत मिळत नसल्यानेही लोक उपचारांसाठी पोहोचत नसल्याची खंत जागतिक पक्षाघात दिनानिमित्त डॉक्टर्स व्यक्त करतात. पक्षाघाताची लक्षणे दिसल्यावर रुग्ण साडेचार तासांच्या आत रुग्णालयात पोहोचला पाहिजे. आल्यानंतर तात्काळ सिटीस्कॅन करुन झाल्यावर रुग्णाचे नातेवाईक एवढे पैसे नसल्याचे सांगतात. या सर्व अडथळ्यांतून साडे चार तास कधी निघून जातात हे देखील कळत नाही. त्यामुळे, याबाबतची जनजागृती मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे असून त्यासह हे इंजेक्शन सहजपणे उपलब्ध होईल शिवाय, त्याची किंमत कमी किंवा ते मोफत दिले गेले पाहिजे असे ही डॉ. रावत यांनी सांगितले.  

केईएम रुग्णालयात पक्षाघाताचे दररोजचे सरासरी 8 ते 10 रुग्ण दाखल होतात. मात्र, त्यातील आठवड्याला एखाद्या रुग्णाला इंजेक्शन (थ्रोम्बोलिसिस) दिले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com