esakal | मुंबई : घर खरेदीसाठी विकासकांकडून ग्राहकांना ऑफर्स IMumbai
sakal

बोलून बातमी शोधा

Housing

मुंबई : घर खरेदीसाठी विकासकांकडून ग्राहकांना ऑफर्स

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाचा फटका देशातील बांधकाम क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसला. बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्याने या क्षेत्राला उभारी मिळाली. यातच घर खरेदीसाठी विकासकांकडून ग्राहकांना ऑफर्स देण्यात येणार असल्याने आगामी उत्सवांमध्ये घर खरेदीत वाढ होईल, असा विश्वास क्रेडाई-एमसीएचआय संघटनेने व्यक्त केला आहे.

दरवर्षी उत्सवी हंगाम विकासकांसाठी वर्षातील सर्वात प्रतीक्षित कालावधी असतो. ग्राहक हा काळ गुंतवणूक करण्यासाठी शुभ मानतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ग्राहकांनी घर खरेदीला अधिक पसंती दिली नव्हती. मात्र दुसऱ्या लाटेनंतर ग्राहक गुंतवणूक करण्यास सकारात्मक असल्याचा दावा क्रेडाई-एमसीएचआय संघटनेने केला आहे. त्याचप्रमाणे, बँकांनी गृह कर्जावरील व्याज दर कमी केल्यामुळे संभाव्य गृह खरेदीदासांठी आगामी हंगाम अनुकूल झाला आहे. सर्व आघाडीच्या वित्त संस्था आणि बँका एम्प्लॉयमेंट कॅटेगरी आणि कर्जाची रक्कम हे निकष न वापरता 6 टक्के ते 6.70 टक्के या व्याजदराने गृहकर्जे देत आहेत.

हेही वाचा: IPL 2021: अर्जुन तेंडुलकर एकही सामना न खेळताच भारतात परतणार

अनेक आघाडीच्या बँकांनी गृहकर्जांवरील कमी केलेले व्याज दर आणि प्रमुख विकासकांनी दिलेल्या सवलती आणि ऑफर्स यामुळे आगामी उत्सवी हंगामात घरांची विक्री कोरोनापूर्व परिस्थितीच्या तुलनेने वाढलेली असेल, असा सकारात्मक विश्वास विकासकांना आहे. संभाव्य घर खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी विकासकांकडून कॅश बॅक, होम ऑटोमेशन, गॅजेट्स, गृहोपयोगी वस्तू, मोड्युलर किचनसारखे फर्निचर यासारखे लाभ देण्यात येत आहेत.

उत्सवी हंगामात बहुतेक विकासक मोठ्या प्रमाणावर विक्री करतात. इतर हंगामांच्या तुलनेने ही विक्री 10-15 टक्के अधिक असते. या वेळी, बहुतेक बँका कमी व्याजदराने गृहकर्जे उपलब्ध करून देत आहेत आणि घर खरेदीदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे या वेळी कोरोनापूर्व परिस्थितीतील विक्रीपेक्षा अधिक विक्री होईल, अशी आमची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक विकासक आकर्षक अर्थसहाय्य योजना व ऑफर्स देत आहेत. ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि त्यांच्या स्वतःच्या घरात राहायला जाण्यास मदत करेल, असे क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष दीपक गोराडिया यांनी सांगितले.

loading image
go to top