esakal | मुंबईत लसीकरणात ज्येष्ठ पिछाडीवर | Vaccination
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination
मुंबईत लसीकरणात ज्येष्ठ पिछाडीवर

मुंबईत लसीकरणात ज्येष्ठ पिछाडीवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईतील कोरोना लसीच्या कमतरतेदरम्यान पालिका लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईत आतापर्यंत एक कोटी 29 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. परंतु या लसीकरणात ज्येष्ठ पिछाडीवर आहेत. दरम्यान, आतापर्यंत सर्व फ्रंटलाईन आणि आरोग्यसेवकांना कोरोनाचा पहिला डोस मिळाला आहे.

16 जानेवारीपासून मुंबईत लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवकांना कोरोनाचे लसीकरण सुरू करण्यात आले. यानंतर, दुसऱ्या टप्प्यात, फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोना लस देण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात वृद्धांचे लसीकरण सुरू झाले. यानंतर, 45 वर्षांवरील आणि 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. मात्र,  सद्य स्थितीत ज्येष्ठ वर्ग लसीकरणामध्ये मागे आहे.

हेही वाचा: न्यायालयांमधील प्रलंबित बांधकामांची अंतरीम स्थगिती उच्च न्यायालयाने वाढविली

पालिका आरोग्य विभागाच्या मते, मुंबईत ज्येष्ठांची संख्या 11,45,016 आहे. यापैकी केवळ 78 टक्के ज्येष्ठांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर, लसीकरणात 45 पेक्षा अधिक गटातील लोक आघाडीवर आहेत. या गटातील 93 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. 18 वर्षांवरील म्हणजे तरुण वर्ग लसीकरणात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 18 वर्षांवरील 85% नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे.

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. यामुळेच सप्टेंबरमध्ये रेकॉर्डब्रेकिंग लसीकरण करण्यात आले. सप्टेंबरमध्ये लाभार्थ्यांना 29 लाखांहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. जुलै-ऑगस्टमध्ये पालिकेला 10 लाख डोस मिळाले होते, तर सप्टेंबरमध्ये पालिकेला 19 लाख 25 हजार डोसचा पुरवठा झाला होता.

loading image
go to top