esakal | मुंबईसह 'या' ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस ? रेड अलर्ट जारी
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rainfall

मुंबईसह 'या' ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस ? रेड अलर्ट जारी

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत सोमवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून त्यासाठी मुंबई मोसम विभागाने (Mumbai Monsoon) पुढील 24 तासांसाठी 'रेड अलर्ट' (Red Alert) जारी केला आहे. पुढील पाच दिवस पावसाचेच (Rainfall) राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करत काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा (Heavy Rainfall) इशारा दिला आहे. ( Mumbai on Red Alert Of heavy rainfall next twenty Four Hours-nss91)

मुंबईसाठी पुढील पाच दिवसांसाठी 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला होता. मात्र दुपारी काही वेळ मंदावलेल्या पावसाने पुन्हा जोर धरल्याने पुढील 24 तासांसाठी अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी 'रेड अलर्ट' जारी करत या दरम्यान मुंबईत काही भागात मुसळधार तर काही भागात अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून यादरम्यान ताशी 45 ते 55 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग ताशी 65 प्रति किमी वाढण्याचा अंदाज देखील मुंबई मोसम विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: ...तर खुशी आणि उर्मिला वाचली असती, ठाकूर कुटुंबियांवर काळाचा घाला!

पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान पाणी तुंबण्याची , वाहतूक ठप्प होण्याची ,पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय पूल वाहून जाणे , पाणी-वीज पुरवठा खंडित होणे , तसेच जीर्ण पडकी घर पडण्याची भीती असून आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकण आणि गोव्यात आज आणि उद्या(ता.19) मुसळधार आणि अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर त्या पुढील तीन दिवस देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

याशिवाय मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यामध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात रविवार आणि सोमवारी अति मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला असून मंगळवार,बुधवार आणि गुरुवारी मात्र पावसाची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या मुसळधार पावसासाठी अनुकूल वातावरण आहे.महाराष्ट्राकडून कर्नाटक कडे नैऋत्य वारे वाहत आहेत. त्यामुळे वातावरणात बदल झाला असून पुढील काही दिवस पाऊस कोसळणार असल्याचे कुलाबा बेधशाळेचे डॉ जयंता सरकार यांनी सांगितले.

loading image