Mumbai : वाहतूक पोलिसांकडून वाहतूकदारांना ऑनलाईन दंडाचा सपाटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

traffic police

Mumbai : वाहतूक पोलिसांकडून वाहतूकदारांना ऑनलाईन दंडाचा सपाटा

मुंबई : वाहतूक पोलिसांकडून ऑनलाईन पद्धतीने वाहतूकदारांना विनाकारण आर्थिक भुर्दंड दिला जात आहे. महिन्याला १० ते १२ हजार रुपये दंड आकारले जात असल्याने व्यवसायापेक्षा दंड अधिक होत आहे.

रात्री सुरक्षित ठिकाणी उभ्या केलेल्या वाहनांना ही ऑनलाईन दंड.केल्या जात असल्याने वाहतूकदारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याविरुद्ध महाराष्ट्र वाहतूक सेनेने आक्रमक भूमिका घेत मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेण्याचे ठरवले असून, विनाकारण दंड देणे टाळण्याची मागणी केली आहे.

मुंबई शहर व उपनगरात मालवाहतूकदारांना वाहतूक विभागाच्यावतीने मोठयाप्रमाणात ऑनलाईन दंड आकारण्यात येत आहे. इतर वाहनांना वाहतूकीला अडचण होणार नाही याची काळजी घेवून रस्त्याच्या बाजूला उभ्या असणा-या मालवाहतूक वाहनांना दंड आकारला जात आहे. अनेक वेळा आपला व्यवसाय संपवून रात्री १० नंतर योग्य ठिकाणी पार्किंग केलेल्या मालवाहतूक वाहनांनाही विनाकारण दंड आकारला जात आहे.

कोविड-१९ महामारीमुळे अजूनही वाहतूकदार पूर्णपणे सावरला नाही आहे तसेच मुंबई मधील व्यापारधंदे मुंबई बाहेर गेल्यामुळे व अनेक उदयोग-व्यवसाय बंद झाल्यामुळे वाहतूक व्यवसायात मंदी असल्यामुळे अनेक वाहने बॅकेचे कर्ज हप्ते वेळेवर न भरल्यामुळे वाहने बँकेने जप्त केल्याने अनेक वाहतूकदार उध्वस्त झाले आहेत.

बेशिस्त वाहतूकदारांना शिस्त लागण्यासाठी दंडात्मक कारवाई व्हावी यामताशी महाराष्ट्र वाहतूक सेना सहमत आहे. परंतू रस्त्यावर वाहन नियमात चालत असताना वाहनाच्या मागील बाजूने फोटो काढून विनाकारण ऑन-लाईन दंड आकारणे म्हणजे वाहतूकदारांची छळवणूक असल्याचा आरोप महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी यांनी केला आहे.