Mumbai : तलाठी पदाच्या परिक्षा शुल्काला राज्यात विरोध, राखीव प्रवर्गासाठी ९०० तर खुला प्रवर्गासाठी १००० रूपये

४६४४ पदांसाठी लाखो उमेदवारांचे अर्ज येण्याची शक्यता .
exam student
exam student Sakal

Mumbai - राज्याच्या महसुल विभागाने तलाठी गट क पदाची मेघाभरती करण्याचा निर्णय घेतला असून, तब्बल राज्यभरात ४६४४ पदे भरण्यासाठी जाहीरात काढली आहे. त्यामूळे तलाठी पदासाठी प्रयत्न करणारे उमेदवारांमध्ये आनंद आहे.

मात्र, सर्वसामान्य उमेदवारांनी परिक्षा शुल्कासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोरोना माहामारीनंतर पहिल्यांदाच तलाठी पदासाठी येवढ्या मोठ्या प्रमाणात पदे भरण्याची जाहिरात निघाली आहे. त्यामूळे लाखो उमेदवार यासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. त्यामूळे यातून गोळा झालेल्या कोट्यावधी रूपयांमध्ये शासन परिक्षा केंद्रांवर अशा कोणत्या सुविधा देणार आहे. असा प्रश्न समाजमाध्यमांवर उपस्थित केला जात आहे.

exam student
Mumbai News: गोरेगावमधील शाळेच्या स्विमिंग पुलमध्ये बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू!

यापुर्वी २०१९ मध्ये तलाठी पदाची जाहिरात काढण्यात आली होती. त्यामध्ये राखीव प्रवर्गासाठी ३५० तर खुला प्रवर्गासाठी ५०० रूपयांचा परिक्षा शुल्क आकारण्यात आला होता. चार वर्षानंतर आता पुन्हा तलाठी पदाची जाहिरात काढली जात असतांना, त्यामध्ये दोन्ही प्रवर्गातील परिक्षा शुल्कात भरमसाठ वाढवण्यात आली आहे.

त्यामूळे आधीच घरची बेताची परिस्थिती असतांना, राज्य शासनातील शासकीय नौकरीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य उमेदवारांचे परिक्षा शुल्का अभावी हिरमोड होण्याची शक्यत आहे.

राज्यभरात अशा अनेक उमेदवारांनी समाज माध्यमांमधून आपला संताप व्यक्त केला जात असून, अनेक वेळा परिक्षेचा फार्म इंटरनेट कॅफे मध्ये जाऊन भरण्यासाठी सुद्धा पैसे राहत नाही. त्यात परिक्षा शुल्क अव्वाच्या सव्वा वाढवले जाते असल्याने सर्वसामान्यांनी शासनाच्या नौकरीचे स्वप्न सोडून द्यायचे का असा प्रश्न सुद्धा विचारल्या जात आहे.

exam student
Pune College Admission : अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात

पदविधर होऊन चार वर्ष झाली आहे. घरची परिस्थिती बेताची आहे. संपुर्ण कुटुंब शेतीत काम करते, मी सुद्धा वेळ मिळेल तसा शेतात जातो. मात्र, शासनाच्या नौकरीचे स्वप्न आहे. कोणीतरी नौकरीवर लागावा असे सर्वांना वाटते म्हणून पदविधर झाल्यापासूनच अभ्यास सुरू केला.

मधात कोरोना महामारी, त्यानंतर अनेक परिक्षा रद्द झाल्या, परिक्षा शुल्क सुद्धा परत मिळाले नाही आणि आता १००० रूपये शुल्क कुठून भरणार आहे. आम्ही गरीबांनी शासनाच्या परिक्षा द्यायच्या की नाही.

- अभय राजुरकर, विद्यार्थी

exam student
Mumbai : महाराष्ट्राचे आराध्य साकारणारा शिल्पकार ५० दिवसात साकारली शिवरायांची ती चांदीची मूर्ती

शासनाकडून भरती प्रक्रिया काढल्या जाते मात्र, अनेकवेळा परिक्षा रद्द, निकाल थांबवून ठेवणे, नियुक्त्या वेळेवर मिळत नाही. सगळा गोंधळ असतो,अशा परिस्थितीतही आम्ही आमचा आत्मविश्वास डगमगु देत नाही. आर्थिक काटकसर करून परिक्षेचे फाॅर्म भरून पुन्हा अभ्यासाला लागतो. मात्र , दरवेळी परिक्षा शुल्कात वाढ केलेली दिसून येते. भरती प्रक्रियेतूनतरी शासनाने कमाई करू नये.

- राजश्री ढोके, विद्यार्थींनी

exam student
Mumbai : १८ वर्षांखालील मुलांनी दुचाकी चालविल्यास पालकांना २५ हजारांचा दंड; कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आदेश

४६४४ पदांसाठी नक्कीच लाखो उमेदवारांचे अर्ज येतील कोट्यावधी रूपयांचा शासनाचा गल्ला तयार होईल, बेरोजगार युवकांना असे लुटून शासनाला काय मिळणार आहे.

- रामेश्वर यादव, विद्यार्थी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com