Mumbai News : मुंबईत परेड ऑफ व्हेटरन्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Parade of Veterans indian army Bhagat Singh Koshyari

Mumbai News : मुंबईत परेड ऑफ व्हेटरन्स

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज एनसीपीए मुंबई येथून सुरु झालेल्या सैन्य दलातील शौर्य पदांनी विभूषित अधिकारी व जवानांच्या वार्षिक संचलन “परेड ऑफ व्हेटरन्स” मध्ये सहभाग घेतला. सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, वीर नारी व त्यांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

राज्यपालांनी सुरुवातीला व्हीलचेअरमध्ये बसून आलेल्या वरिष्ठ सेवानिवृत्त सैन्य अधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना अभिवादन केले. त्यानंतर शेकडो युवक व नागरिकांच्या ‘वंदे मातरम्’ च्या जयघोषात माजी सैनिक अधिकाऱ्यांच्या संचलनासोबत चालून माजी सैनिकांप्रती त्यांनी सद्भावना प्रकट केली.परेड ऑफ व्हेटरन्सचे आयोजन नेव्ही फाऊंडेशनच्या पश्चिम विभाग मुंबई शाखेच्या सहकार्याने केले होते.

परेडमध्ये 500 माजी वीर अधिकारी, व जवान त्यांचे कुटुंबीय व नागरिक सहभागी झाले होते. यावेळी नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंह, लष्कराच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा प्रभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एच. एस. कहलों, नेव्ही फाऊंडेशन, मुंबई विभागाचे अध्यक्ष कमांडर विजय वढेरा आदी उपस्थित होते.

टॅग्स :Mumbai NewsNavi Mumbai