कोविड महामारीत मुंबईकरानी बिघडवले हाडे, सांध्यांचे आरोग्य

bone paining
bone painingsakal media

मुंबई : कोविड संसर्गात (corona infection) मुंबईकरांनी त्यांच्या हाडांचे आणि सांध्यांचे आरोग्य (Bone health) बिघडवल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. घटलेली शारीरिक हालचाल, बदललेली जीवनशैली (changes in lifestyle) यामुळे मुंबईकरांच्या हाडे व सांध्‍यांच्‍या आरोग्‍यावर गंभीर परिणाम झाला. शहरात ऑर्थोपेडिक तक्रारींच्‍या संख्‍येमध्‍ये वाढ झाल्‍याचे डॉक्‍टरांच्‍या (Doctor) निदर्शनास आले असून हे चिंताजनक सर्वेक्षण मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयासह (Fortis hospital) इतर रुग्णालयातील गटाने केले. यात डॉक्टरांनी हाडे व सांध्‍याचे आरोग्‍य, कोरोनाचे दीर्घकालीन परिणाम याबाबत माहिती जाणून घेतली.

bone paining
रायगड: ज्ञानाची पातळी उंचावण्यासाठी वाचन गरजेचे; 'सकाळ'मार्फत मार्गदर्शन शिबिर

या संशोधनामध्‍ये १८ वर्षांवरील ५,००५ मुंबईकरांचा समावेश होता. प्रतिसादकांपैकी ६५ टक्‍के महिला, तर ३५ टक्‍के पुरुष होते, बहुतांश प्रतिसादकांचे वय ३१ ते ४० वर्षांदरम्‍यान होते. हे सर्वेक्षण गॅजेटचा वापर, कार्यालयीन, घरातील कामे यामधील संतुलन, कोरोनाकाळात झालेले जीवनशैलीतील बदल आणि हाडांच्‍या आरोग्‍याला दिले गेलेले महत्त्व यावरही लक्ष केंद्रित करते. यामधून अनेकजण हाडे व सांध्‍यांच्‍या आरोग्‍याकडे लक्ष देत नाहीत असे निदर्शनास आले.

ऑर्थोपेडिक्‍स अॅण्‍ड जॉइण्‍ट रिप्‍लेसमेंट सर्जरीचे संचालक डॉ. कौशल मल्‍हान म्‍हणाले, ‘महामारीमुळे अनेक जण गेली दोन वर्षे व्‍यायाम आणि इतर गोष्टींपासून दूर राहिले. आता त्यांनी कोविडपूर्व जीवनशैली व व्‍यायामाकडे परतताना सावधगिरी बाळगण्‍याची गरज आहे. त्‍यांनी हाडांची‍ तपासणी केली पाहिजे.

bone paining
मुंबई एलईडी पथदिव्यांनी लखलखणार; रखडलेली कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार?

हिरानंदानी रुग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जरीचे विभागप्रमुख डॉ. प्रमोद भोर म्‍हणाले, की सर्वेक्षणातून २६ टक्‍के मुंबईकरांना रुग्णालयात जाण्‍याच्‍या भीतीमुळे विलंब केला आणि ५८ टक्‍के मुंबईकर गंभीर स्थिती नसल्‍यामुळे औषधोपचाराच्‍या माध्‍यमातून ऑर्थोपेडिक समस्‍यांचे व्‍यवस्‍थापन करू शकले.

मुंबईकरांचे कोविडकाळातील जीवन

५६ टक्के मुंबईकरांनी घर संभाळण्यासोबत वृद्ध व मुलांची काळजी घेतली
७३ टक्के मुंबईकरांकडे घरातील कामे करण्यासाठी योग्य सेटअप नव्हता
४१ टक्के मुंबईकरांनी १० तासांहून अधिक काम केले
१८ टक्के मुंबईकर संगणकावर काम करत नसताना फोनवर चिटकून राहिले
४० टक्के मुंबईकरांनी दोन ते चार तास घरातील, बाहेरील कामे केली
७५ टक्के मुंबईकरांनी हाडे व सांध्यासंबंधित समस्यांचा सामना केला.
२५ टक्के मुंबईकरांना मान व खांद्याच्या समस्या जाणवल्या.
१९ टक्के मुंबईकरांना पाठ व पायाच्या समस्या जाणवल्या.
८ टक्के मुंबईकरांना हात-पाय सुस्त पडल्यासारखे वाटले.
२५ टक्के मुंबईकरांना अस्वस्थतेमुळे पुरेशी झोप मिळाली नाही.
५८ टक्के मुंबईकरांनी आपल्या आजारांवर औषधोपचार केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com