esakal | मुंबई: उद्या पाणी उकळून आणि गाळूनच प्या, कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai water

मुंबई: उद्या पाणी उकळून आणि गाळूनच प्या, कारण...

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : भांडूप जलशुध्दीकरण केंद्रातील (Water Filtration) पाणी शुध्दिकरण आणि पुरवठा यंत्रणा (Water supply) टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात येत आहे. सोमवारीही मुंबईतील (Mumbai) काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तब्बल 12 तासाहून अधिक काळा पर्यंत हे काम सुरु होते. भांडूप (Bhandup) जलशुध्दिकरण केंद्रातील गाळणी तसेच उदचंन यंत्रणात पाणी शिरल्याने या यंत्रणा बंद करण्यात आल्या होत्या. पाण्याचा उपसा करुन यंत्रणा करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी (BMC) पहाटेपासून झटत होते. ही यंत्रणा आता टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात येत आहे. नागरीकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे असे आवाहन पालिकेने केले आहे. ( Mumbai people Drink Warm and clean Water Due to water supply issue says BMC -nss91)

हेही वाचा: एक पावसाळी रात्र अन् होत्याचं नव्हतं झालं... गोरसे कुटुंबावर शोककळा

एच-पश्चिम विभागातील चॅपल रोड परिसर, खारदांडा, के-पूर्व भागातील मोगरापाडा, पार्ले पूूर्व परिसर, के-पश्चिम विभागातील यारी रोड, पी-उत्‍तर विभागातील मढ, गांधीनगर, पी-दक्षि‍ण विभागातील बिंबीसार परिसर, आर-दक्षिण वि‍भागातील ठाकूर संकूल, लोखंडवाला संकूल, आर-उत्‍तर विभागामध्‍ये दहिसर परिसर यासोबत शहर भागामध्‍ये जी-दक्षि‍ण विभागातील तुळशीपाईप मार्ग, सेनापती बापट मार्ग परिसर, एन. एम. जोशी मार्गावर दादर ते भायखळा दरम्‍यान, तसेच जी-उत्‍तर विभागात दादर, माहिम, धारावी, डी विभागात भुुलाभाई देसाई मार्ग, ताडदेव, महालक्ष्‍मी, ए विभागात कुलाबा, कफ परेड अशा निरनिराळ्या भागांमध्‍ये टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने पाणीपुरवठा देण्‍यात येत आहे.

loading image