Lalit Patil Case : नाशिकच्या गिरणा नदीपात्रात सापडलं कोट्यवधींचं ड्रग्ज! मध्यरात्रीपासून अंडरवॉटर शोधमोहिम सुरू

Lalit Patil drugs Case crores worth of drugs found in girna river nashik Mumbai police
Lalit Patil drugs Case crores worth of drugs found in girna river nashik Mumbai police

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून अटक करण्यात आली होती, यानंतर मुंबई पोलिसांनी नाशिकच्या ग्रामीण भागात मोठी कारवाई केली आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात असलेल्या गिरणा नदीपात्रात ड्रग्जचा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला आहे. दरम्यान नाशिकच्या ग्रामीण भागात ड्रग्जचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीपासून सुरू असलेले शोधकार्य आज सकाळी देखील सुरूच आहे. पोलिसांकडून नदीपात्रातून ड्रग्ज बाहेर काढण्याची प्रयत्न सुरू आहेच. ललित पाटील याचा ड्रायव्हर सचिन वाघ याच्या चौकशीतून याबद्दलची माहिती मिळाली होती. यानंतर मुंबई पोलिसांच्या टीमला रात्री दोन वाजता नदीत अंडरवॉटर कॅमेऱ्याच्या मदतीने ड्रग्जच्या गोण्या सापडल्या होत्या. त्यानंतर आज सकाळी देखील नदीत फेकण्यात आलेले ड्रग्ज शोधण्याचे काम सुरू आहे.

Lalit Patil drugs Case crores worth of drugs found in girna river nashik Mumbai police
Lalit Patil Drugs Case: ललित पाटीलचा आणखी एक कारनामा आला समोर, जेलमधून रुग्णालयात जाण्यासाठी केला ड्रामा? VIDEO

ललित पाटील याचा ड्रायव्हर सचिन वाघ याने ड्रग्ज नष्ट करण्याच्या उद्देशाने आतापर्यंत दोन गोण्या ड्रग्ज नदीपात्रात फेकल्याची माहिती पोलिसांना दिली होती, त्यानंतर पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. दरम्यान या ड्रग्जची किंमत अंदाजे १०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

Lalit Patil drugs Case crores worth of drugs found in girna river nashik Mumbai police
Lalit Patil Drug Case : निवडणुकीच्या केंद्रस्थानी ड्रग्ज! दोन्ही सेनेत ललित पाटीलच्या प्रवेशावरून जुंपणार

ललित अनिल पाटील (वय ३४, रा. नाशिक) याची चाकण येथील अमली पदार्थ विक्री प्रकरणात येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर जून महिन्यात त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुख्य आरोपी ललित पाटील याला वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना पोलिसांना चकवा देऊन तो फरार झाला होता.

पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अखेर चेन्नईतून अटक केली. तो सध्या पोलिस कोठडीत असून त्याची चौकशी केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com