नवनीत बऱ्हाटे
उल्हासनगर : एकेकाळी शिक्षण आणि व्यापारासाठी ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगर शहरात आता नशेचे काळे जाळे विस्तारू लागले आहे. चिंतेची बाब म्हणजे हा नशेचा सापळा केवळ झोपडपट्ट्यांपुरता मर्यादित न राहता थेट शहरातील प्रतिष्ठित, धनाढ्य आणि सामाजिकदृष्ट्या प्रभावशाली कुटुंबांतील तरुणांपर्यंत पोहोचला आहे. आधुनिकतेच्या आहारी गेलेले आणि हायफाय जीवनशैलीचा हव्यास असलेले तरुण गांजा, ड्रग्स आणि नशेच्या गोळ्यांच्या आहारी जात समाज व कुटुंबाचे भवितव्य उध्वस्त करत आहेत.