पैशांसाठी ४ महिन्याच्या मुलीची विक्री, बापासह ११ जणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

4 Month old gilr sold tamilnadu

पैशांसाठी ४ महिन्याच्या मुलीची विक्री, बापासह ११ जणांना अटक

मुंबई : एका चार महिन्याच्या मुलीची पावणेपाच लाख रुपयांना मुंबईतून तमिळनाडूला विक्री (4 Month Old Girl Sold) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ११ जणांना अटक केली असून बाळाची विक्री करणारा मुलीचा बापच असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: शारीरिक संबंधासाठी स्वतःच्याच पत्नीवर बोली, टेलिग्राम-मेसेंजरचा वापर

लसीकरणाच्या बहाण्यानं घेऊन गेला अन्...

गिरगाव येथून २७ डिसेंबरला चार महिन्याची मुलगी बेपत्ता झाली होती. मुलीचा बाप इब्राहीम शेख (३२) हा मुलीला लसीकरणाच्या बहाण्याने घराबाहेर घेऊन गेला. पण, तो तिला घेऊन घरी परतला नाही. त्यानंतर अन्वरी अब्दुल शेख यांनी त्याला मुलीबाबत विचारणा केली. पण तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यामुळे अन्वरी यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी ३ जानेवारीला अपहरणाची तक्रार दाखल केली. तसेच इब्राहीमला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता मुलीला लसीकरणासाठी नाहीतर तमिळनाडूमध्ये नेऊन विकल्याची कबुली त्यानं दिली. त्याच्यासोबत आणखी चार जण होते आणि सेलवनपट्टी येथील एका सिव्हील इंजिनिअरला मुलीला विकल्याचं पोलिसांना सांगितलं. याबाबत इंडियन एक्सप्रेसनं वृत्त दिलं आहे.

काय होती मोडस ऑपरेंडी? -

पत्नी सोडून गेल्यामुळे मी एकटा मुलीची काळजी घेऊ शकत नाही, असं आरोपी बापानं पोलिसांना सांगितलं. त्याने ही समस्या त्याचा मित्र मोहम्मद शेरखानला बोलून दाखवली. शेखने त्याची भेट लक्ष्मी दीपक मुर्गेश या महिलेसोबत करून दिली. त्यानंतर त्यांनी मुलीला तमिळनाडूमधील एका जोडप्याला विकण्याचं ठरवलं. त्यानुसार मुलीचा बाप इब्राहीम सद्दाम शाह, अमजद शेख, ताहीरा शेख यांच्यासोबत तमिळनाडूला गेला. तिथे आरोपी कार्तिक राजेंद्र, त्याची पत्नी चित्रा, तमिळ थंगराज, मुर्ती सामी या चौघांना भेटला. त्यानंतर या सर्वांनी मिळून या मुलीची ४ लाख ८० हजाराला एका सिव्हील इंजिनिअरला विकले. बाळाला या जोडप्याला विकल्याची माहिती मिळताच उपनिरीक्षक दिलीप तांबे आणि राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखालील एक पथक तामिळनाडूला गेले आणि तीन जिल्ह्यांमध्ये शोध मोहीम सुरू केली. चार दिवसांत उर्वरीत आरोपींना अटक करण्यात आली.

टोळीचा पदार्फाश -

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, इब्राहीमची चौकशी केल्यानंतर मुंबई पोलिसांनी सायन, धारावी, मालाड जोगेश्वरी, मुंबईतील नागपाडा, कल्याण आणि ठाण्यातील काही भागात छापे टाकले. यावेळी दोन महिला आणि चार पुरुषांना अटक करण्यात आली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Tamil Nadu
loading image
go to top