गावाला जायच्या 'ई पास'च्या QRमध्ये करायचा फेरफार आणि उकळायचा पैसे, मुंबई पोलिसांच्या लक्षात आली ही बाब आणि...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

अवघ्या काही तासात बनवून द्यायचे गावाला जायचा 'ई-पास'  बनावट ई-पास देणा-या ठगाला अटक

मुंबई : गावी जाण्यासाठी निघालेल्या परप्रांतीयांना किंवा महाराष्ट्रातच मुंबईतून कोकणात किंवा गावाला जायला बनावट ई-पास देत या लोकांची तसेच राज्य सरकारची फसवणक करणा-या एका ठगाला डोंगरी पोलिसानी अटक केली आहे. या भामट्याने मुंबई, नवी मुंबई, पालघर पोलीस तसेच जिल्हाधिका-यांच्या क्युआर कोडमध्ये फेरफार केल्याची महिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी दिली.मनोज हुंबे असे अटक आरोपीचे नाव आहे.

कोरोनाच्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशांत लॉकडाऊन घोषीत केला आहे. या लाॅकडाऊनमध्ये नागरीकांना अथवा मजुराना परवगावी तसेच इतर शहरात जायचे असेल तर त्यांना संबधीत शहर अथवा जिल्हा पोलिसांकडुन ई-पास घेणे क्रमप्राप्त आहे.

मोठी बातमी: महाराष्ट्रात असा असेल लॉकडाऊन 5.0; जयंत पाटलांनी दिले संकेत...

अशातच एक माथेफिरु अवैधरित्या ई-पास प्रत्येकी 5 हजार रुपयांना विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हा आरोपी  मोबाईल क्रमांकावरुन पास देत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार, पोलिसानी याची खात्री करीत त्याला चेंबुर येथून अटक केली.

यावेळी मुंबई पोलिस आयुक्तांचे कार्यालय, नवी मुंबई पोलिस आयुक्तांचे कार्यालय, जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांचे कार्यालय तसेच जिल्हाधिकारी पालघर यांचे कायर्यालय यांच्यामार्फत प्रवासाची सवलत मिळण्यासाठी मिळणारे ऑनलाईन क्यूआर कोड मध्ये फेरफार करून सदरचे बनावट पास हे खरे पास आहेत असे प्रदर्शित करून सरकारची फसवणूक करीत असल्याचे समोर आले. यावेळी पोलिसांनी त्याला अटक केले असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

mumbai police arrested man doing e gravel pass fraud in mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai police arrested man doing e gravel pass fraud in mumbai