स्टोरी एकदम सिनेमात शोभेल अशी : 'तो' २३ वर्षांपूर्वीच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता, पण शेवटी..

सुमित बागुल
Friday, 17 July 2020

१९९७ चं म्हणजेच तब्बल २३ वर्ष जुनं असं हे प्रकरण आहे. हरिश कल्याणदास भावसार उर्फ परेश झवेरी असं या व्यापाऱ्याचं नाव आहे

मुंबई - असं म्हणतात कायद्याच्या आणि पोलिसांच्या तावडीतून गुन्हेगार कधीही सुटू शकत नाही. खरंतर  याआधीही या गोष्टीचा प्रत्यय अनेकदा आलाय. आता पुन्हा एकदा मुंबईतील या घटनेने हीच गोष्ट अधोरेखित केलीये. १९९७ पासून फरार असलेला, म्हणजेच तब्बल २३ वर्ष फरार असणाऱ्या व्यापाऱ्यास मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. 

मुंबईच्या  इंटरेस्टिंग बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

प्रकरण नक्की आहेत तरी काय ?

१९९७ चं म्हणजेच तब्बल २३ वर्ष जुनं असं हे प्रकरण आहे. हरिश कल्याणदास भावसार उर्फ परेश झवेरी असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. सोनं आणि हिरे तस्करी प्रकाराने परेश झवेरी पोलिसांना हवा होता. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार परेश झवेरी परदेशातून कच्चे सोने आणि हिरे भारतात आणायचा. हे हिरे आणि सोनं भारतात आणताना हा व्यापारी कर चुकवेगिरी करायचा. या व्यापाऱ्याने तब्बल १३० कोटींचा कर भरला नव्हता असा त्याच्यावर आरोप आहे. दरम्यानच्या काळात ED म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयामार्फत त्याची चौकशीही सुरु झाली होती. मात्र अधिकारी आणि पोलपोलिसांच्या हातावर तुरी देऊन परेश 'नौ दो ग्यारा' झालेला.  

मोठी बातमी! नागपूरमध्ये होणारी कोरोना लसीची मानवी ट्रायल लांबणीवर, वाचा कारण

२३ वर्षांनंतर अडकला पोलिसांच्या जाळ्यात : 

परेश झवेरीची फाईल कधीही बंद झाली नव्हती. पोलिस कायम त्याच्या मागावर असल्याने आता तब्बल २३ वर्षांनंतर सरकारला १३० कोटींचा चुना लावणारा परेश झवेरी पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी हरिश कल्याणदास भावसार उर्फ परेश झवेरी याला कॉन्झर्व्हेहशन ऑफ फॉरेन एक्सजेंच अँड प्रिव्हेन्शन ऑफ स्मगलिंग ऍक्टिव्हिटी म्हणजेच COFEPOSA  अंतर्गत अटक केलीये. पोलिसांनी त्याच्या भावाची मालमत्ता देखील ताब्यात घेतलीये. 

mumbai police arrested man for not paying tax of 130 crore after 23 years


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai police arrested man for not paying tax of 130 crore after 23 years