मोठी बातमी! नागपूरमध्ये होणारी कोरोना लसीची मानवी ट्रायल लांबणीवर, वाचा कारण

मोठी बातमी! नागपूरमध्ये होणारी कोरोना लसीची मानवी ट्रायल लांबणीवर, वाचा कारण

मुंबई - नागपूरच्या गिल्लूरकर मल्टी स्पेशालीटी रुग्णालयात कोरोनावरील covaxin या लसीचे मानवी ट्रायल लांबणीवर गेले आहे. एका महिन्यानंतर चाचणीला सुरुवात होणार आहे. भारत बायोटेक लि आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने कोरोनावर लस विकसित केली आहे. कोरोना प्रतिबंधित लसीची मानवी चाचणी दिल्लीतील ‘एम्स’सह चार संस्थेत होत आहे. त्याचे प्राथमिक निरीक्षण आल्यावर राज्यातील एकमात्र नागपूरच्या खासगी रुग्णालयातील केंद्रासह इतर एकूण आठ केंद्रांवर दुसऱ्या टप्प्यातील चाचणी होईल. दरम्यान, नागपूरमध्ये होणारी चाचणी जवळपास एक महिना लांबणीवर गेली आहे.

आधी 'या' चार संस्थांमध्ये होणार चाचणी - 

नवीन नियोजनानुसार, पहिल्या टप्प्यात दिल्ली एम्ससह पाटणामधील एक वैद्यकीय संस्था, रोहतक मेडिकल कॉलेज, निझामुद्दीन इन्स्टिटय़ूट (हैदराबाद) या चार सरकारी केंद्रांमध्ये ही चाचणी होणार आहे. यापैकी काही ठिकाणी चाचणी सुरूही झाली आहे. चारही ठिकाणी 18 ते 55 वयोगटातील सुमारे 50 सुदृढ व्यक्तींना ही लस दिली जाणार आहे. प्राथमिक निरीक्षणानंतर दुसऱ्या टप्प्यात नागपूरच्या गिल्लूरकर मल्टी स्पेशालिटी रुग्णालयासह देशातील इतर 8 केंद्रांवर चाचणी सुरू होणार आहे. पण, या 50 लोकांवर ही चाचणी व्हायला अजून बराच वेळ जाईल. आणि दुसरा टप्पा सुरू व्हायला किमान एका महिन्याचा कालावधी जाईल अशी माहिती गिल्लूरकर रुग्णालयाचे 
संचालक डाॅ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी दिली आहे. 

आयसीएमआरने 15 ऑगस्टपर्यंत या लसीची चाचणी पूर्ण करण्याचा प्रयत्न होता. परंतु ते शक्य दिसत नाही आहे. नागपूरच्या डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी या चाचणीसाठी तीस व्यक्तींची यादीही आयसीएमआरसह संबंधित यंत्रणेकडे पाठवली होती. मात्र, नागपूरचा समावेश दुसऱ्या टप्प्यात झाल्याने येथे चाचणी सुरू होण्यास किमान एक महिना लागणार आहे.

या लसीचे प्रि-क्लिनिकल ट्रायल न्यूजीलँडमध्ये माकड, उंदीर, ससे यांच्यावर करण्यात आली आहे. आवश्यक त्या चार ही निकषात ( सुरक्षितता, प्रतिक्रिया, सहनशीलता आणि रोग प्रतिकार क्षमता ) ही लस 100 टक्के यशस्वी ठरली आहे. 

क्लिनिकल ट्रायल च्या पहिल्या टप्यात 18 ते 55 वयोगटातील 375 स्वयंसेवकांवर लसीचा प्रयोग होणार आहे. तर, दुसर्या टप्प्यात 750 स्वयंसेवकांवर सर्व जण मिळून चाचणी करणार आहेत. 

कोवॅक्सीन ही लस प्रामुख्याने "होल विरीयॉन इनऍक्टीवेटेड वॅक्सीन" असून त्यात मृत कोरोना व्हायरसचा वापर करून त्याची पॅथोजेनिसीटी - रोग निर्माण करण्याची शक्ती नष्ट केली आहे. त्याच वेळेस त्याची इम्युनोजेनिसीटी - शरीरात अँटीबॉडीज तयार करून रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्याची शक्ती कायम ठेवली आहे. 


रुग्णालयात या लसीचे ट्रायल सुरू व्हायला किमान एक महिना लागू शकतो. आधी चार संस्था ही ट्रायल 50 जणांवर करणार आहेत. यांचे अहवाल आल्यानंतर बाकी 8 संस्थामध्ये रेग्युलर ही चाचणी सुरू होईल. पहिल्या टप्प्यात 375 आणि दुसर्या टप्प्यात 750 लोकांवर ही ट्रायल केली जाईल. 

डाॅ. चंद्रशेखर गिल्लूरकर,
संचालक, गिल्लूरकर मल्टी स्पेशालीटी रुग्णालय

 ---------------------------------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com