कुख्यात 'बोलबच्चन गॅंग' पोलिसांच्या जाळ्यात; पोलिसांनी असा लावला होता सापळा...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

मुंबई: मुंबईत गुन्हेगारीचं मोठं विश्व आहे. नेहमीच चोरी आणि लुटमारीच्या घटना समोर येत असतात. मात्र तुम्ही कधी 'बोल बच्चन गँगचं' नाव एकलं आहे का ? मुंबईत चोरी आणि लुटमारी करणाऱ्या टोळ्यांपैकी गंभीर गुन्हे करण्यात सर्वात सक्रिय टोळी म्हणून बोल बच्चन गॅंगची दहशत आहे. मात्र या टोळीच्या २ जणांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलं आहे. 

मुंबईची डार्क साईड म्हणजे मुंबईतील गुन्हेगारी विश्व. मुंबईतून नेहमीच चोऱ्या-माऱ्या,  लुटमार यासारख्या घटना समोर येत असतात. अशात आता मुंबई पोलिसांनी 'बोलबच्चन गँग' च्या मुसक्या आवळल्यात. मुंबईत चोरी आणि लुटमारी करणाऱ्या टोळ्यांपैकी गंभीर गुन्हे करण्यात सर्वात सक्रिय टोळी म्हणून बोलबच्चन गॅंगची दहशत आहे. अशात याच टोळीतील दोघांना आता पोलिसांनी घेतलंय.

बोलबच्चन गँग ही लोकांची लूटमार करत असल्याच्या तक्रारी सतत मालाड आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांकडून पोलिसांना येत होत्या. गळ्यात सोन्याचे दागिने असणाऱ्या, जवळ महागड्या वस्तु असणाऱ्या किंवा पैसे असणाऱ्या लोकांना ही गँग लुटत होती. निर्जनस्थळी अशा लोकांना गाठून आपण पोलिस असल्याचं सांगत लोकांकडून महागड्या वस्तु, दागिने आणि पैसे लुटण्याचे धंदे ही गँग करत होती. मात्र आता मालाड पोलिसांना या गँगच्या दोघांना पकडण्यात यश आलंय. 

मोठी बातमी : मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय ! जमावबंदी लागू करण्याचे दिले आदेश 

विजय कुमार जयस्वाल आणि गणेश दत्तू लोंढे अशी या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत. याआधीही लुटमारीच्या गुन्ह्यात या आरोपींना अनेकवेळा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  याआधी या दोघांवरही संपूर्ण मुंबई  शहराच्या काही पोलिस ठाण्यांमध्ये तब्बल ६५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांकडून मिळतेय. गुन्हा घडलेल्या ठिकाणांचे सिसिटीव्ही फुटेज तपासून आणि पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

मोठी बातमी - दाढीमुळे तुम्हाला आहे 'कोरोना' व्हायरसचा धोका ?

"या दोघांवर संपूर्ण मुंबईच्या पोलिस स्टेशनमध्ये ६५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोन्ही आरोपी अतिशय गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. मालाड पोलिस स्टेशनच्या काही अधिकाऱ्यांनी सतत काही दिवस सिसिटीव्ही फुटेजद्वारे या दोघांवर नजर ठेवली. तसंच त्यांच्या कॉल रेकॉर्डिंगवर देखील पोलिसांचं लक्ष होतं. याचमुळे पोलिसांना या दोन आरोपींना पकडण्यात यश आलं." असं डिसीपी मोहनकुमार दहिकर यांनी म्हंटलंय. 

धक्कादायक! त्याने मारला मोबाईल म्हणून तिनेही घेतली ट्रेनमधून उडी आणि.. 

या प्रकरणात या दोन आरोपींवर लुटमारीचे आणि पोलिस असल्याचं सांगून लोकांना फसवण्याचे असे काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन आरोपींना २ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.    

mumbai police arrested two accused from bol bachchan gang


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai police arrested two accused from bol bachchan gang