त्याने मारला मोबाईल म्हणून तिनेही घेतली ट्रेनमधून उडी आणि...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 February 2020

मुंबई : मुंबईमध्ये मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. बोरिवली स्थानकावर अशीच एक घटना धक्कादायक घडलीये. चोरट्यानं एका महिलेचा फोन तिच्या हातातून हिसकावत पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि ट्रेनच्या बाहेर उडी घेतली. मात्र या शूर महिलेने आपला फोन वाचवण्यासाठी प्राणांची बाजी लावलीये. यामुळे ही महिला गंभीर जखमी झाली आहे.

मुंबई : मुंबईमध्ये मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. बोरिवली स्थानकावर अशीच एक घटना धक्कादायक घडलीये. चोरट्यानं एका महिलेचा फोन तिच्या हातातून हिसकावत पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि ट्रेनच्या बाहेर उडी घेतली. मात्र या शूर महिलेने आपला फोन वाचवण्यासाठी प्राणांची बाजी लावलीये. यामुळे ही महिला गंभीर जखमी झाली आहे.

हेही वाचा: अजित पवारांना क्लीनचिट देणारे 'हे' आहेत मुंबईचे नवे बॉस 

नक्की काय घडलं.. 

पीडित महिला पालघरहून घरी परतत असताना ही घटना बोरीवली स्थानकात घडली.  संध्याकाळी ६.५० वाजता तिनं पॅसेंजर ट्रेन पकडली. ८.११ वाजता पॅसेंजर बोरिवली स्थानकात पोहोचली. यावेळी महिलेनं तिच्या घरी फोन केला पण नेटवर्क नसल्यामुळे ती ट्रेनच्या दारात जाऊन उभी राहिली. ट्रेन सुरू होताच चोरट्यानं तिच्या हातातून मोबाइल हिसकावला, मात्र महिलेनं त्याच्या दंडाला पकडलं. त्यामुळे त्यानं धावत्या ट्रेनमधून उडी घेतली. त्याच्यासोबत महिलेनंही देखील उडी घेतली. मात्र चोरट्यानं त्या महिलेला फरफटत नेलं. या सर्व प्रकारात महिला गंभीर जखमी झाली आहे. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर काही लोकं या महिलेच्या मदतीसाठी धावले. मात्र तोपर्यंत चोरट्याला पळण्यात यश आलं होतं. परिसरातल्या लोकांनी या महिलेवर प्रथमोपचार केले. पोलिसांकडून या महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं . 

हेही वाचा: समोरच्याला समजू न देता असे वाचा #whatsapp वरचे मेसेज.. 

याप्रकरणी पीडित महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या घटनेत तपास करताना सिसिटीव्ही फुटेजची पाहणी केलीये. याबाबत बोलताना पोलिसांनी आरोपीचं नाव वसिम शेख असं असल्याचं म्हटलंय. वासिम हा एक सराईत गुन्हेगार आहे असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलंय. पोलिसांनी आरोपी वसिम शेख याचा शोध सुरू केला आहे.         

woman jump out of train as her mobile had stolen by thief at borivali
   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman jump out of train as her mobile had stolen by thief at borivali