esakal | गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या, गुन्हे शाखेची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Crime Branch: गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने बोल बच्चन गँगच्या दोन आरोपींना (Two Arrested) अटक केली आहे. हे दोन्ही गर्दीचा फायदा (Crowd Benefit) घेऊन आणि समोरच्या व्यक्तीला आपली ओळख दाखवून (Identity) बोल बच्चन करून फसविण्याचे काम करायचे. हे आरोपी ओळख नसताना ओळखीचे असल्याचे भासवायचे, नंतर संधी साधत चोरी करायचे. ते दुसऱ्या व्यक्तींच्या नावावर सीमकार्ड खरेदी (Sim Card) करायचे आणि नागरिकांशी संवाद साधायचे. त्यामुळे ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते.( Mumbai Police Arrested two in cheating people and Roberry-nss91)

दिनेश बाबू मंचेकर (32) सुरेश तानाजी महादे (45) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बोलबच्चन टोळीच्या टोळी प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात 26 मार्च 2021 ला गुन्हा दाखल झाला होता. आरोपींनी आपली ओळख सांगून तक्रारदाराला बोलण्यात गुंतवले. त्यानंतर आरोपी संधी मिळताच तक्रारदाराचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाले. संबंधित प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेल मार्फत सुरू होता.

हेही वाचा: ग्रीन कॉरिडॉर सुस्साट! 'या' ठिकाणाहून फक्त ८३ मिनिटांत हृदय पोहोचले

तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलिसांना या गँगच्या प्रमुख आरोपीचा सुगावा लागला. पोलिसांनी मोबाईल नंबर ट्रेसकडून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. संबंधित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून दिवा शीळफाटा, कल्याण डोंबिवली या भागात लपून बसला होता. अखेर पोलिसांनी त्याला दिवा पूर्वेतून अटक केली. अटक केलेल्या प्रमुख आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर माटुंगामध्ये लपलेल्या त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे. या दुसऱ्या आरोपीवर मालाड, पंतनगर, आरसीएफ, मीरा रोड आणि इतर अनेक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

loading image