esakal | सायन: जान मोहम्मद शेखच्या कुटुंबाची मुंबई ATS कडून चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

अटक

सायन: जान मोहम्मद शेखच्या कुटुंबाची मुंबई ATS कडून चौकशी

sakal_logo
By
नामदेव कुंभार

दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने मंगळवारी दहशतवादी हल्ल्यांचा कट उधळून लावला. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेशातून सहा जणांना अटक करण्यात आली. सहा राज्यात एकाच वेळी 15 स्फोट घडवून आणण्याचा इरादा या दहशतवाद्याचा होता, असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. अटक केलेल्यांमध्ये ओसामा सामी (वय २२, रा.ओखला), झिशान कमर (वय २८, रा. अलाहाबाद) हे दोन दहशतवादी पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन यावर्षीच भारतात आले होते. यांच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर आम्ही पोलिसांचे विशेष पथक तयार केले होते. यातील एकाला महाराष्ट्रातून अटक केली. जान महंमद शेख ऊर्फ समीर कलिया (वय ४७) हा महाराष्ट्रातील आहे. उत्तर प्रदेशमधील मूळचंद ऊर्फ साजू ऊर्फ लाला (वय ४७, रायबरेली), महंमद अबू बकर (वय २३, बहराईच) व महंमद आमीर जावेद (वय ३१, लखनौ), अशी अन्य तीन दहशतवाद्यांची नावे आहेत. जान महंमद शेख हा मुंबईतील सायन येथे राहणारा आहे.

हेही वाचा: JEE मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, 18 जण पहिल्या क्रमांकावर

दिल्ली पोलिसांनी जान महंमद शेख याला अटक केली. त्यानंतर मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र एटीएसनेही जान शेख याच्या सायन येथील घरी धाड टाकली. जान शेख याच्या घराची झडती घेण्यात आली. त्यानंतर कुटुंबीयांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. धारावी पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी नेण्यात आले होतं. चौकशीनंतर कुटुंबाला सोडण्यात आलं आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जान शेख हा मुख्य सुत्रधार आहे. हाच जान शेख अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिमच्या संपर्कात होता. एवढंच नाहीतर जान शेख 2 पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. त्यांना देखील अटक करण्यात आलं आहे.

दाऊदच्या भावाशी संपर्क?

ओसामा व झिशान हे मस्कतला गेले होते. तेथून ते पाकिस्तानात पोहोचले. त्यांनी तेथे स्फोटकांचे प्रशिक्षण घेतले. हे दोघे ‘स्लिपर सेल’ म्हणून कार्यरत होते. सीमेपलीकडील काही व्यक्तींच्या ते सतत संपर्कात असल्याचेही समजले आहे. यातील एक जण दाऊद इब्राहिम याचा भाऊ अनिस आहे. हवालामार्फत त्यांना पैसा पुरविला जात होता. शहरे हेरून उत्सवादरम्यान तेथे घातपात करण्याची त्यांची तयारी होती, अशी माहिती ठाकूर यांनी दिली. शस्त्रे, दारुगोळा व स्फोटकांच्या साठ्यांसह या दहशतवाद्यांना अटक केल्याचेही ते म्हणाले.

loading image
go to top