Mumbai Police Bribery
esakal
मुंबई : मुंबईतून पोलिसांबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वडाळा टी.टी. पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे (वय ५२) आणि पोलिस उपनिरीक्षक राहुल वाघमोडे (वय ३७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने शुक्रवारी (ता. २७) लाच घेताना (Mumbai Police Bribery) रंगेहात पकडले.