ते आलेत आणि त्यांनी आईच्या चेहऱ्यावर फुलवलं हसू, सर्वच स्तरातून होतंय मुंबई पोलिसांचं कौतुक 

ते आलेत आणि त्यांनी आईच्या चेहऱ्यावर फुलवलं हसू, सर्वच स्तरातून होतंय मुंबई पोलिसांचं कौतुक 

मुंबई - लॉकडाऊनमध्ये आरोग्यसेवक आणि पोलीस आपल्या जीवावर उदार होऊन काम करत आहेत ते आपल्या रक्षणासाठी आणि आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी. आपल्या सेवेसाठी कायदा आणि सुरक्षा राहावी म्हणून पोलीस काम करत असतानाच एका मुलाच्या विनंतीवरून पोलिसांनी 69 वर्षाच्या आईचा वाढदिवस साजरा केला आहे. त्यामुळे, मुंबई पोलिसांनी त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडवून देतानाच सर्वसामान्यांच्या सुखदु:खात सहभागी कसं व्हायचं हे देखील दाखवून दिलं आहे. असाच एक प्रसंग अंधेरी येथील नागरिकांना अनुभवण्यास मिळाला. 

जेव्हा पोलिस वाढदिवसासाठी केक घेऊन येतात...

मुंबईतच राहणार्या मात्र लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या  मंगेश आंबरे यांनी पोलिसांना ट्विट करून विनंती केली होती की आईला 69 वर्षे पूर्ण झाले असून आम्ही तिन्ही मुले विविध ठिकाणी राहत आहोत. लॉकडाऊनमुळे त्यांना एकत्र येणे किंवा त्यांचा वाढदिवस साजरा करणे शक्य होणार नाही. या विनंतीकडे मानवतेच्या दृष्टीने पोलिसांनी पाहत एमआयडीसी पोलिसांनी आईचा वाढदिवस साजरा करून वृद्ध दाम्पत्याला सुखद धक्का दिला. पोलिसांनी ट्विटवरून मुलाने केलेली मागणी मान्य करून काल या वयोवृद्ध महिलेचा जन्मदिवस केक कापून साजरा केला. 

मुंबईत कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत असताना लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घराच्या बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. आपल्या वयोवृद्ध आईचा वाढदिवस 5 मे ला आहे. ती 69 वर्षाची होणार आहे. मात्र, त्यांच्याकडे आम्ही तिघा भावांपैकी कोणालाही तेथे जाता येत नसल्याने एका मुलाने मुंबई पोलिसांनाच ट्विटर 3 मे ला ट्वीट केलं आणि पोलिसांनी त्या आईचा वाढदिवस आम्ही साजरा करू असे सांगताच त्या मुलांनी मुंबई पोलिस दलाचे आभार मानले.

मुलांनी पाळला लॉकडाऊन अन् पोलिसांनी कापला केक 

अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाकाली गुंफा येथील बिंद्रा कॉम्प्लेक्स येथे एक वयोवृद्ध जोडपे राहते. या जोडप्याला तीन मुलं आहेत. त्यातील एक नवी मुंबईत, दुसरा ठाण्यात, तर तिसरा बांद्रा येथे राहतो. या मुलांनी आपण संचारबंदीचे  नियम तोडून आई वडिलांचे आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात न घालता मुंबई पोलिसांना विनंती करुन आईचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले.
त्यानुसार, सोमवारी सायंकाळी त्या मुलाच्या घरी जाऊन केक कापत आईला पोलिसांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सोसायटीतील नागरिकही यात सहभागी झाले होते.

mumbai police celebrates birthday of mother while sons were stuck during lockdown

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com