गजाली हॉटेल गोळीबार, गँगस्टर रवी पुजारीविरोधात आरोपपत्र दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ravi pujari

गजाली हॉटेल गोळीबार, गँगस्टर रवी पुजारीविरोधात आरोपपत्र दाखल

मुंबई : गँगस्टर रवी पुजारीविरोधात (Ravi Pujari) मुंबईत पहिले आरोपपत्र गुरूवारी दाखल करण्यात आले. विलेपार्ले येथील गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणी (Gajalee firing case) हे आरोपपत्र दाखल करण्यता आले आहे. सेनेगल येथून प्रत्यार्पण करण्यात आलेल्या रवी पुजारी याच्या विरोधात मुंबईत 49 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 26 गुन्हे "मोक्का' अंतर्गत आहेत. 2017-18 मध्ये अनेकांनी त्याच्याकडून धमकीचे फोन येत असल्याच्या तक्रारी दाखल केल्या. (Mumbai Police Crime Branch files charge sheet against gangster Ravi Pujari in Gajalee firing case)

2009 ते 2013 दरम्यान पुजारीने सलमान खान, अक्षय कुमार, करण जोहर, राकेश रोशन यांना धमकावल्याचे सांगण्यात येते. यातील गजाली हॉटेलमधील गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केले पुजारी विरोधात दाखल मुंबईत दाखल करण्यात आलेले हे पहिले आरोपपत्र आहे.

हेही वाचा: 'मित्रांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहिले', 'टायटॅनिक पेक्षाही भयानक स्थिती'

पुजारी विरोधात बंगळूरुत 39, मंगलोरमध्ये 36, उडुपीत 11, म्हैसूर-हुबळी-धारवाड-कोलार-शिवमोगा येथे प्रत्येकी एक गुन्हा पुजारीच्या विरोधात दाखल आहे. पुजारीच्या विरोधात गुजरातमध्येही सुमारे 75 गुन्हे दाखल आहेत

loading image
go to top