
Loudspeaker Row : मुंबईत दोन मशिदींवर गुन्हा दाखल
मुंबई : मुंबईतील वांद्रे आणि सांताक्रूझ भागातील दोन मशिदींनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मशिदींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदींवरील भोग्यांवरून मोठ्या प्रमाणात राजकारण तापलेले असताना ही कारवाई करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत कोणी स्पीकर वाजवत असेल तर, त्याने ठरवून दिलेल्या डेसिबलच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र मुंबईतील दोन मशिदींनी त्याचे पालन केले नाही. त्यामुळे पोलिसांनी वांद्रे येथील नूरानी मशीद आणि सांताक्रूझ येथील कब्रस्तान मशिदीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Mumbai Police Filed FIR Over Loudspeaker)
गुरुवारी सकाळी वांद्रे येथील नुरानी मशिदीमध्ये लाऊडस्पीकरवर नमाज अजान करण्यात आली. सकाळी 6 च्या आधी लाऊडस्पीकर न वापरण्याबाबत पोलिसांनी एक दिवस अगोदर सूचना देऊनही मशिदीत सकाळच्या अजानसाठी लाऊडस्पीकर वापरण्यात आले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी भादंवि कलम 188 आणि महाराष्ट्र पोलिसांच्या कलम 37 (1), (3), 135 नुसार तक्रार दाखल केली आहे. कायदा आणि ध्वनी बंदी नियमांचे कलम 33 (R) (3) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: राज्यात हुकूमशाही चालणार नाही; अजित पवार यांचा राज ठाकरे यांना इशारा
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय
2005 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गोंगाट करणाऱ्या उपकरणांवर बंदी घातली होती. या आदेशानुसार लाऊडस्पीकर वाजवण्यापासून ते मोठ्या आवाजात संगीत, फटाके फोडण्यापासून हॉर्न वाजवण्यापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या कलमाने आदेशात रात्रीच्या वेळी ध्वनिप्रदूषण करणाऱ्या कोणत्याही उपकरणांचा वापर करण्यास मनाई केली आहे.
Web Title: Mumbai Police Filed Two Cases For Not Following Supreme Court Order Over Loudspeakers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..