Black Film On Car: चारचाकी वाहनांच्या काचांना काळ्या फिल्म लावल्या तर वाहनधारकाला ५०० ते १५०० रुपयांचा फटका बसणार आहे. पोलीस प्रशासन याबाबत अधिक सतर्क झाले आहे.
मुंबई : चारचाकी वाहनांच्या काचांना काळ्या फिल्म लावल्या तर वाहनधारकाला दंड करण्याची तरतूद मोटार वाहन कायद्यात आहे. मात्र तरीही काही मुंबईकर नियम उल्लंघन करतात. अशा वाहनचालकांना ५०० ते १५०० रुपयांचा फटका बसणार आहे.