एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daya-Nayak

गोंदिया जिल्ह्यातील जात पडताळणी विभागात केलेल्या बदलीला स्थगिती

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना दिलासा

मुंबई: राज्याच्या पोलिस दलात (Police Force) विविध घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच पोलिस दलात मोठे बदल करण्यात आले. राज्याच्या महासंचालकपदी संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर गुरूवारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट (Encounter Specialist) दया नायक (Daya Nayak) यांची दहशतवादविरोधी पथकातून (ATS) बदली करण्यात आली. ATS मधून दया नायक यांना गोंदिया जिल्ह्यात पोलिस निरीक्षक म्हणून बदली (Transfer) करण्यात आली होती. मात्र आता या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. नायक यांच्या बदलीला मॅट (MAT) कडून (Maharashtra Administrative Tribunal) स्थगिती देण्यात आली आहे. (Mumbai Police Force Encounter Specialist Daya Nayak Transfer Postponed of MAT)

हेही वाचा: Big Breaking: एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची ATSमधून बदली

दया नायक यांची बदली ही प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. दया नायक यांनी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात (Mansukh Hiren Murder Case) ATS कडून तपास करत सचिन वाझे आणि त्याच्या सह-आरोपींचा पर्दाफाश करण्यात मोठी कामगिरी बजावली होती. त्यानंतरही त्यांची बदली का करण्यात आली? अशी चर्चा वर्तुळात होती. पण अखेर मंगळवारी दया नायक यांना मोठा दिलासा मिळाला. आता दया नायक हे दहशतवाद विरोधी पथकातच राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Web Title: Mumbai Police Force Encounter Specialist Daya Nayak Transfer Postponed Of

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top