esakal | Big Breaking: एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची ATSमधून बदली
sakal

बोलून बातमी शोधा

Encounter-Specialist-Daya-Nayak

Mansukh Hiren Murder Case मध्ये सचिन वाझे आणि त्याच्या साथीदारांचा पर्दाफाश करण्यात महत्त्वाची भूमिका

Big Breaking: एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची ATSमधून बदली

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: राज्यातील पोलिस दलात (Police Force) विविध घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच पोलिस दलात मोठे बदल करण्यात आले. राज्याच्या महासंचालकपदी संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर गुरूवारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक (Encounter Specialist Daya Nayak) यांची दहशतवादविरोधी पथकातून (ATS) बदली करण्यात आली आहे. ATS मधून दया नायक यांना गोंदिया जिल्ह्यात पोलिस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. दया नायक यांची बदली ही प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दया नायक यांनी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात (Mansukh Hiren Murder Case) ATS कडून तपास करत वाजे आणि त्याच्यासह आरोपींचा पर्दाफाश करण्यात मोठी कामगिरी बजावली.

हेही वाचा: धक्कादायक! पुण्यात पोलिस हवालदाराचा खून

दया नायक यांची दहशतवादी विरोधी पथकातून बदली करण्यामागचे कारण प्रशासकीय असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना थेट गोंदिया जिल्ह्यात पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्र पोलिस दलात अनेक बदल्या होताना दिसत आहेत. त्यामुळे या बदलीमागे काही वेगळी कारणं तर नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. दया नायक यांनी मनसुख हिरेन प्रकरणात महाराष्ट्र ATSकडून तपास करत वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि त्याच्या साथीदारांचा पर्दाफाश करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण कालांतराने या प्रकरणाचा तपास NIA कडे गेला. त्यामुळे ATS ने हे प्रकरणाचा तपास थांबवला.

हेही वाचा: तीन IPS अधिकाऱ्यांची पोलिस महासंचालकपदी बढती

कोण आहेत दया नायक...

दया नायक मुंबईच्या पोलिस वर्तुळातील चर्चेत असणारं नाव आहे. मुंबई पोलिस दलात ते 1995 मध्ये दाखल झाले. दया नायक यांनी अनेक गुंडांना चकमकीत ठार केले. दया नायक हे मुंबईतील अंडरवर्ल्डशी संबंधित आहेत असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली होती. दया नायक यांनी त्यांच्या कर्नाटकातील मूळ गावी शाळा सुरू केली असून त्या शाळेचे उदघाटन अमिताभ बच्चन यांनी केले. या वेळी अनेक बडी मंडळी उपस्थित होते. दया नायक यांना काही काळ तुरुंगवासही भोगावा लागला होता. याशिवाय, त्यांच्या नावे बेहिशेबी मालमत्ता असल्याचाही आरोप करण्यात आला होता.