Mumbai Crime: मुंबई पोलिसांना लाच घेणे पडले महागात; 3 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Police Bribe Crime
Police Bribe Crimeesakal

पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चेंबूर येथील एका सावकाराकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी 3 पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.तिघांनाही भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत आरोप असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Police Bribe Crime
Mumbai Crime: खंडणीसाठी बॉम्बस्फोटाची धमकी; आरोपींना झाली अटक

या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांना चेंबूर परिसरातील आरसीएफ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. या तिघांपैकी एक मुरलीदार कर्पे सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत आहेत. या पूर्वी कर्पे आरसीएफ पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर असून एक महिन्यापूर्वी त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर बढती मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक राहुल जाधव आणि पोलीस हवालदार गणेश मोझर हे अन्य 2 आरोपी पोलीस अधिकारी आहेत.

Police Bribe Crime
Mumbai Crime: 18 वर्षीय तरुणीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल; 3 जणांविरोधात गुन्हा दाखल

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, 17 लाखांच्या फसवणुकीच्या प्रकरणी तक्रारदाराने प्रथम आरसीएफ पोलिस ठाण्यात संपर्क साधला होता. या प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. परंतु पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी पुढील चौकशीसाठी लाचेची मागणी केली व तीही स्वीकारली.

नंतर, आरोपी अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडून गुन्हा नोंदवण्यासाठी आणखी लाच मागितली,परंतु कंटाळून तक्रारदाराने 8 डिसेंबर रोजी एसीबीकडे गुन्हा नोंदवला आणि तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांना 14 डिसेंबर रोजी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. कर्पे यांनीच आपल्या एका मध्यस्थ व्यक्तीमार्फत लाचेची मागणी केल्याचे नंतर समोर आले.

Police Bribe Crime
Mumbai Crime: नऊ वर्षीय मुलीचा विनयभंग करणारा 'तो' आरोपी गजागाड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com