esakal | मुंबई : पोलीसांनी वृद्धेला साडी, चोळी देऊन केले मुलांच्या हवाली
sakal

बोलून बातमी शोधा

police

मुंबई : पोलीसांनी वृद्धेला साडी, चोळी देऊन केले मुलांच्या हवाली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोखाडा : जनसामान्यांमध्ये पोलीसांविषयी अनेक समज आणि गैरसमज आहेत. पोलीसांची प्रतीमा नेहमीच वादातीत ठरणारी असते. मात्र, जव्हार पोलीसांनी या सर्व बाबी खोट्या ठरवत माणुसकीचे दर्शन उडवणारे कृत्य केले आहे. 

जव्हार तालुक्यातील जामसर वडपाडा येथील एका वृद्धेला तिच्या मुलांनी घरातून बाहेर काढून दिले होते. डोक्यावरचे छप्पर हरपल्याने वृध्द महिला दारोदार भटकत होती. ही बाब कळताच जव्हारचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांनी तीच्या मुलांशी संपर्क साधून, वृद्धेला साडी, चोळी देऊन वृद्धेला त्यांच्या घरी पाठवत, माणुसकीचे दर्शन घडविले आहे. 

हेही वाचा: मोदी सरकारकडून किरिट सोमय्यांना झेड सुरक्षा

जव्हार तालुक्यातील वडपाडा येथील जीवी चैत्या पडेर ( 65 )  या वृद्धेला 4 मुले आहेत, ही मुले वृद्ध आई सोबत नेहमी भांडण करत असत व तीचा सांभाळ करण्यासाठी टाळाटाळ करीत असत. नंतर मुलांनी तीला घरा बाहेर काढून दिले होते. घर नसल्यामुळे ही वृध्द महिला दारोदार भटकत होती. ही घटना जव्हार पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक आप्पासाहेब लेंगरे यांना समजली.

त्यांनी या वृध्देच्या दोन मुलांना पोलीस ठाण्यात बोलावून सज्जड दम दिला व तिचा सांभाळ करून पालन पोषण करा असे सांगितले. तसेच तिला एक नवीन साडी, चोळी खरेदी करून दिली. आम्ही आता नीट सांभाळू असे तीच्या मुलांकडून आश्वासन घेतले, त्यानंतर मुलांनी तिला घरी नेले. जव्हार पोलीसांच्या या मातृ प्रेमाच्या कारवाई ने संपुर्ण पोलीस दलाची प्रतीमा, जनसामान्यांमध्ये ऊंचावली आहे.

loading image
go to top