मुंबई पोलिस दलातील निरीक्षक सुनील माने सेवेतून बडतर्फ

अंबानी स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरण भोवलं
Sunil-Mane-Mumbai-Police
Sunil-Mane-Mumbai-Police
Summary

अंबानी स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरण भोवलं

मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवसास्थानी सापडलेली स्फोटके (Antilia Explosive Case) तसेच मनसुख हिरेन हत्येप्रकरणी (Mansukh Hiren Murder Case) राष्ट्रीय तपास पथकाने (NIA) अटक केलेले पोलीस अधिकारी सुनील माने (Sunil Mane) यांना सेवेतून बडतर्फ (Dismiss) करण्यात आले आहे. संविधानाच्या कलम 311अंतर्गत मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी ही कारवाई केली. या प्रकरणात त्यांचे नाव आल्यानंतर त्यांना गुन्हे शाखेतून सशस्त्र (LA) विभागात बदली करण्यात आली होती. (Mumbai Police Inspector Sunil Mane Dismissed from Services connection to Mansukh Murder Case Ambani Explosive Case)

Sunil-Mane-Mumbai-Police
सचिन वाझेचं शिवसेनेच्या अनिल परबांशी कनेक्शन?

NIA ने सुनिल मानेला अटक केल्यानंतर त्याचा अहवाल राज्य गृहमंत्रलयाला पाठविला होता. त्यानुसार 24 एप्रिलला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, सुनिल माने हे मुंबईतील कांदिवली गुन्हे शाखेच्या कक्ष 11 चे माजी पोलीस निरीक्षक होते. त्यावेळी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला मदत केली होती, असा संशय एनआयएला आहे. 3 मार्च रोजी सचिन वाझे यांच्या सीआयययूच्या केबिनमध्ये बैठक झाली होती. त्यात सुनील मानेही उपस्थित होते. या बैठकीत मनसुखला गुन्हा कबुल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यानंतर त्याच दिवशी रात्री अंधेरी पूर्व चकाला येथे सचिन वाझे, विनायक शिंदे, सुनील माने आणखी एक माजी अधिकारी यांची या संदर्भात भेट झाली होती.

Sunil-Mane-Mumbai-Police
मनसुख हत्या प्रकरणात लवकरच आणखी दोघांना अटक?

या भेटीचे पुरावे एनआयएला मिळाले आहेत. कांदिवली क्राईम ब्रँच येथून तावडे नावाने मनसुख हिरेनला 4 मार्च रोजी रात्री फोन करून घोडबंदर रोडवर बोलावणारी व्यक्ती सुनील माने असावी असा संशय देखील एनआयएला आहे. बुकी नरेश गोर याने उपलब्ध केलेल्या सीमकार्डपैकी दोन सीमकार्ड आणि मोबाईल सुनिल माने वापरत असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याने वाझेला अटक होताच, याप्रकरणातील अनेक पुरावे नष्ट केल्याचा संशय एनआयएला आहे. मनसुख हिरेनला गााडीत घातल्यानंतर माने याने रेती बंदर पर्यंत त्याला सुरक्षा पुरविल्याचा संशय एनआयएला आहे. त्यानुसार, एनआयएच्या पथकाने माने याला रेती बंदर येथे नेऊन, या ठिकाणी तपास करण्यात आला होता. माने यांच्याशी संबंधीत ठिकाणीही एनआयएने शोध मोहिम राबवली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com