esakal | मनसुख हत्या प्रकरणात लवकरच आणखी दोघांना अटक?

बोलून बातमी शोधा

Mansukh-Hiren

मनसुख प्रकरणात अनेक आजी-माजी अधिकारी NIA च्या रडारवर

मनसुख हत्या प्रकरणात लवकरच आणखी दोघांना अटक?

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई: उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकांसहित आढळलेल्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्या प्रकरणात पोलिस अधिकारी सुनील माने याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली. मनसुख हिरेनच्या हत्येच्या वेळी तो घटनास्थळी उपस्थित असल्याचा NIA ला संशय आहे. न्यायालयाने सुनील मानेच्या कोठडीत 14 दिवसांची म्हणजेच 13 मे पर्यंत वाढ केली आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आतापर्यंत केलेली सुनील मानेंची तिसरी अटक असून विनायक शिंदे आणि नरेश गोर यांना एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. सुनील माने यांनी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन वाझेला मदत केली होती. सध्या मनसुख हिरेन प्रकरणात आणखी काही आजी-माजी अधिकारी NIA च्या रडारवर असून लवकरच आणखी दोघांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: CBSE च्या १०वीच्या निकालाची तारीख जाहीर

विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर या दोघांना ATSने अटक करून NIA कडे सोपवले आहे. सुनील मानेला अटक करण्यात आल्यावर त्यांची चारचाकी गाडीही जप्त करण्यात आली. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मनसुख हिरेन यांना रात्रीच्या वेळी फोन करणारे तावडे सुनील मानेच असल्याचा संशय NIA ला आहे. सुनिल माने हा मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट 11चा माजी पोलीस निरीक्षक होता. त्यावेळी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला मदत केली होती, असा संशय एनआयएला आहे. 3 मार्च रोजी सचिन वाझे यांच्या CIUच्या केबिनमध्ये सुनील माने, विनायक शिंदे आणि सचिन माने यांची बैठक झाली होती. या बैठकीत मनसुखच्या हत्येची योजना आखण्यात आली होती. त्यानंतर त्याच दिवशी रात्री अंधेरी पूर्व चकाला येथे सचिन वाझे, विनायक शिंदे, सुनील माने आणखी एक माजी अधिकारी यांची या संदर्भात भेट झाली होती. या भेटीचे पुरावे NIA ला मिळाले आहेत.

हेही वाचा: ऑक्सिजन पुरवठ्याबद्दल राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

कांदिवली क्राईम ब्रँच येथून तावडे नावाने मनसुख हिरेनला 4 मार्च रोजी रात्री फोन करून घोडबंदर रोडवर बोलावणारी व्यक्ती सुनील माने असावी असा संशय देखील एनआयएला आहे. तर या प्रकरणी आणखी दोघांना लवकरच अटक होणार असल्याची माहिती NIA मधील सूत्रांनी दिली.