drugs seized
sakal
मुंबई : नेस्को प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ विशेषतः एक्स्टॅसी, एलएसडी, कोकेन आदी पार्टी ड्रगची तस्करी, विक्री, वाहतूक करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम उघडली आहे. या विशेष कारवाईत अटकेसह वर्षभराचा प्रतिबंधात्मक ताबा, हद्दपारी, अमली पदार्थांच्या विक्रीतून उभारलेल्या मालमत्तांची जप्ती, अवैध बांधकामांचे पाडकाम, मोक्काचे हत्यार उपसले जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.