वाढदिवसाच्या मिरवणुकीत तलवारीचं प्रदर्शन करणं अबू आझमींना भोवलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

abu azmi

वाढदिवसाच्या मिरवणुकीत तलवारीचं प्रदर्शन करणं अबू आझमींना भोवलं

मुंबई: समाजवादी पार्टीचे (Samajwadi party) आमदार अबू आझमी (Abu azmi) यांचा काल वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करताना उत्साही कार्यकर्ते आणि अबू आझमींनी स्वत: कोविड नियमांचे (Covid rules) उल्लंघन केले. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी FIR दाखल केला आहे. आझमींसह बर्थ डे पार्टीला हजर असणाऱ्या १७ जणांविरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम १८८ आणि २६९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय. विधानसभेमध्ये अबू आझमी मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.

अबू आझमींनी काय उल्लंघन केलं?

अबू आझमींच्या वाढदिवसा निमित्त जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी कार्यकर्ते देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू आझमी मास्क न लावता रथामध्ये बसले होते. रथामध्ये बसलेल्या आझमींच्या हातात तलवार होती. त्या तलवारीचे त्यांनी सर्वांसमोर प्रदर्शनही केले. या प्रकाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे.

हेही वाचा: पुणे आजपासून अनलॉक; काय सुरू राहणार, काय बंद राहणार

सध्या कोविड काळात नेत्यांकडून जबाबदारीच्या वर्तनाची अपेक्षा केली जात आहे. पण काही नेत्यांना याचा विसर पडताना दिसतो. अबू आझमींच्या वाढदिवसाच्या मिरवणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे समोर आले आहे. अबू आझमींसाठी वाद नवीन नाहीयत. यापूर्वी सुद्धा अनेकदा त्यांच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाले आहेत.

Web Title: Mumbai Police Registered Case Against Abu Azmi In Birthday Celebration Violating Covid Rules

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :abu azmi