सुशांत सिंह प्रकरणी मुंबई पोलिस आयुक्तांचा 'मोठा' खुलासा, उघड केली 'ही' माहिती...

सुशांत सिंह प्रकरणी मुंबई पोलिस आयुक्तांचा 'मोठा' खुलासा, उघड केली 'ही' माहिती...

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचा दावा मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी केला आहे. आतापर्यंत 56 लोकांचे जबाब नोंदविले गेले असून घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र त्यातून पार्टी झाल्याचा कुठलाही पुरावा पुढे आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात सुशांत सिंहने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. नैराश्येतून आत्महत्या की कुणी आत्महत्येस प्रवृत्त केलं या दोन्ही बाजूने तपास सुरु असल्याचेही परमवीर सिंह यांनी म्हटले आहे.

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर मित्रपरिवार, कुटुंबातील नातेवाईक, व्यवसायाशी निगडित चित्रपटसृष्टीतील अनेकांचे जबाब वांद्रे पोलिसांनी नोंदविले आहेत. मुंबई पोलिसांनी प्रथम आकस्मिक निधनाची नोंद करून तपास सुरू करण्यात आलेला आहे. यात पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ञ, आणि डॉक्टर टीमचे सहकार्य घेतले आहे.

सुशांतच्या आत्महत्यानंतर मुंबई पोलिसांनी नोंदविलेल्या जबाबात सिंह यांच्या परिवारातील कुणीही संशय व्यक्त केला नव्हता. मात्र सुशांतच्या वडिलांनी राजीव नगर पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार बिहार पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि फसवणूक या गुन्ह्या अंतर्गत रिया चक्रवतीवर गुन्हा दाखल केला. याबाबत बोलताना मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितले, बिहार पोलिसांचा तपास कायदेनिहाय सुरू आहे. त्यांनी सुरू केलेली चौकशी योग्य आहे काय? याबाबत आम्ही सांगू शकत नाही. मात्र सदर प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करीत असल्याने हे  प्रकरण किंवा दाखल गुन्हा हा वर्ग करायला हवा होता असे मत पोलिस आयुक्त सिंग यांनी व्यक्त केले. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या बहिणींना बोलावले होते. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्या सध्या तणावात आहेत अशी माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी बिहारच्या उपमुख्यमंत्री, अन्य नेत्यांकडून मुंबई पोलिसांच्या तपासावर आक्षेप उचलले जात आहे. मुख्यमत्री नितीश कुमार यांनीही मुंबई पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पहिल्यांदा मुंबई पोलिस आयुक्तांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. सुशांत याच्या बँकेत असलेले 18 कोटी रुपये कुठं गेले याची सखोल चौकशी पोलीस करीत आहेत. 

पोलिसांनी 13 जून आणि 14 जूनचे सीसीटीव्ही मिळवले असून यात कुठल्या प्रकारे पार्टी झाल्याचे दिसत नाही. तसेच दिशा सालीयन हिच्या प्रकरणामुळे सुशांत टेन्शनमध्ये आणि तणावात होता. सुशांत याने गुगलवर बायपोलर डिसऑर्डर, स्किजोफ्रेनिया सारख्या आजारांच्या बाबत शोध घेत होता. सुशांतच्या कुटुंबातील लोकांनी जबाब नोंदविले मात्र बोलावल्यावर आले नाहीत असा खुलासा आयुक्तांनी केला.

( संपादन - सुमित बागुल )

mumbai police on right track in sushant sing rajput case investigation

mumbai 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com