
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या खटल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मलिक यांच्यावर एट्रॉसिटी गुन्ह्यात कारवाई का नाही असा सवाल समीर वानखेडे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. यावर मुंबई पोलिसांकडून उच्च न्यायालयात उत्तर देण्यात आलं. नवाब मलिक यांच्याविरोधातील प्रकरणाचा तपास चार आठवड्यात पूर्ण करू अशी हमी मुंबई पोलिसांनी दिली.