esakal | भाऊचा धक्का, एक सुनसान बोट आणि बोटीतील 'तो' खजाना; मग पोलिसांना आला संशय आणि...
sakal

बोलून बातमी शोधा

भाऊचा धक्का, एक सुनसान बोट आणि बोटीतील 'तो' खजाना; मग पोलिसांना आला संशय आणि...

डिझेल तस्करीप्रकरणी गुन्हे शाखेकडून तिघांना अटक, 35 लाखांचे डिझेल भाऊचा धक्का येथून जप्त

भाऊचा धक्का, एक सुनसान बोट आणि बोटीतील 'तो' खजाना; मग पोलिसांना आला संशय आणि...

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : समुद्र मार्गे डिझेलची तस्करी करणा-या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून याप्रकरमी 43 हजार लिटर डिझेल जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या डिझेलची किंमत 35 लाख रुपये आहे. भाऊचा धक्का परिसरात एक टग बोटमधून हे डिझेल जप्त करण्यात आले असून परदेशी जहाजातून ते आणल्याचा पोलिसांना संशय आहे.

गुन्हे शाखेच्या गुप्तचर कक्षाचे (सीआययू) सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना मिळालेल्या विशेष माहितीच्या आधारे भाऊचा धक्का येथे सापळा रचण्यात आला होता. त्यावेळी बरसातू या टग बोटमध्ये छापा टाकण्यात आला. बेलार्ड पिअर येथील एका कंपनीच्या मालकीची ही बोट असून त्यात नऊ खलाशी उपस्थीत होते. 29 मेपासून ती तेथे उभी आहे. त्यावेळी तपासणीत 43 हजार 104 लिटर डिझेल पोलिसांना सापडले. त्याची किंमत 35 लाख रुपये आहे.

मोठी बातमी - मुंबईतील जमिनीखालचा 'महाकाय मॉन्स्टर' आला जमिनीवर, तब्बल पाच तास रस्त्यावरून प्रवास...

मुख्य अभियंता देबाशीस विश्वास आणि मास्टर इस्माईल मुजावर यांना या डिझेलबाबत अधिकृत कागदपत्रे सादर करण्यात सांगण्यात आली. पण ती न दिल्यामुळे या दोघांसह बोटीचा अधिक्षक राजेश कुटे यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गेल्या तीन वर्षात या बोटीचा वापर माल ने आण करण्यासाठी करण्यात आलेला नाही. पण त्यानंतरही ती बोट समुद्रात का ठेवण्यात आली होती. त्यामुळे या बोटीचा वापर डिझेल तस्करीसाठी करण्यात येत असल्याचा पोलिसांना संशय असून त्या अनुषंगाने पोलिस अधिक तपास करत आहेत. 

(संपादन - सुमित बागुल )

mumbai police sets a trap and busted diesel of worth 35 lakhs from bhau cha dhakka

loading image
go to top