कॉलरवरील 'टेलर मार्क' मुळे पोलिसांनी लावला खुनाचा छडा, अशी घडली होती घटना..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

  • समुद्रात सुटकेसमध्ये आढळले मानवी अवयव
  • शर्टच्या कॉलरवरील टेलर मार्क मुळे झाली गुन्ह्याची उकल 

मुंबईतील माहीम समुद्रात एक सुटकेस सापडलीये. धक्कादायक बाब म्हणजे  या सुटकेसमध्ये मुंबई पोलिसांना चक्क मानवी अवयव आढळून आलेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाकोल्यातून  दोघांना वाकोल्यातून अटक केली आहे. या सर्व भीषण प्रकारात एका प्रेमी युगुलाने संपत्तिसाठी ही हत्या करून मृतदेहाचे तीन भागात तुकडे करून हे तुकडे तीन सुटकेसमध्ये टाकून तिन्ही सुटकेस मिठी नदीत फेकून देण्यात आली होत्या. दरम्यान पोलिसांच्या तपासणीत बॅनोटो असं या ६२ वर्षीय मृत इसमाचे नाव पुढे आलंय. 

धक्कादायक :  मुंबईत पुन्हा हिट अँड रन, 23 वर्षीय तरुणी जागीच ठार..

मुंबई तसेच मुंबई बाहेरील पंचतारांकित हॉटेल मध्ये म्युझीक शो करणारे बॅनोटो हे सांताक्रुझ पूर्व वाकोला मस्जिद येथे एकटेच राहण्यास होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी एका तरुणीला दत्तक घेतले होते. या तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होते, बॅनोटो यांची संपत्ती आपल्याला मिळावी म्हणून दत्तक घेतलेल्या तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने बॅनोटो यांची राहत्या घरातच हत्या केली. त्यानंतर बॅनोटो यांच्या शरीराचे तीन भागात तुकडे करून ते भाग तीन वेगवेगळ्या सुटकेस मध्ये टाकून तिन्हीही सुटकेस वाकोला येथून वाहत जाणाऱ्या मिठी नदीच्या पात्रात फेकून दिले होते. त्यातील एक सुटकेस माहीम पोलिसांना सोमवारी माहीम दर्ग्याच्या मागे असलेल्या समुद्रात सापडली होती, त्यात पोलिसांना एक हात, एक पाय आणि पुरुषाचे गुप्तांग मिळून आले होते. या प्रकरणी माहीम पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

महत्त्वाची बातमी 'विदेशातील कांदा विकू देणार नाही' 

या गुन्ह्यात संलग्न तपास करणाऱ्या गुन्हे शाखा कक्ष ५ च्या हाती काही पुरावे हाती आले, या पुराव्यावरून गुन्हे शाखेने या किचकट आणि आव्हानात्मक गुन्ह्याची उकल करून दोघांना वाकोल्यातून अटक करण्यात आली.

माहीम पोलिसांना माहीम दर्गा येथील समुद्र किनारी वाहत आलेल्या सुटकेसमध्ये मानवी अवयवांसह एक शर्ट पॅन्ट मिळून आले होते. शर्टच्या कॉलर वर 'अल्मो' टेलर हा मार्क होता. या मार्क वरून गुन्हे शाखा कक्ष ५ ने टेलरचा शोध घेतला असता सदर टेलर हा कुर्ला पश्चिम येथील बेलग्रामी रोडवर अल्मो टेलरचे दुकान मिळून आले होते.

गुन्हे शाखा कक्ष ५ चे प्रभारी जगदीश साईल यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी. योगेश चव्हाण, सपोनि. महेंद्र पाटील आणि पथक यांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून आरोपीचा शोध घेऊन दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीत या दोघांनी गुन्हाची कबुली  दिली.

WebTitle : mumbai police solved murder case from tailor mark on the collar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai police solved murder case from tailor mark on the collar