गुन्हा कराल तर घोडा लागेल पाठी, मुंबई पोलिस घोड्यावरून करणार गुन्हेगारांचा पाठलाग..

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 January 2020

तब्बल ८८ वर्षांनंतर मुंबई पोलीस पुन्हा घोड्यावर  

मुंबई -  मुंबई पोलिस गुन्हेगारांना पकडण्याच्या आपल्या हटके स्टाइलने नेहमीच चर्चेत असतात. स्कॉटलंडयार्ड नंतर मुंबई पोलिसांचा नंबर लागतो असं बोललं जातं. मात्र आता मुंबई पोलिस थेट घोड्यावरून गुन्हेगारांचा पाठलाग करणार आहेत. मुंबई शहरात पेट्रोलिंग करण्यासाठी तब्बल ८८ वर्षांनंतर मुंबई पोलिस घोड्यांचा वापर करणार आहे. दिवसागणिक मुंबईत गाड्यांची संख्या वाढतेय. अशात मुंबई पोलसांना शहराची पाहणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचमुळे मुंबई पोलिस आता घोड्यावरून संपूर्ण शहराचं पेट्रोलिंग करणार आहेत.

८८ वर्षांपूर्वी व्हायचं घोड्यावरून पेट्रोलिंग 

या आधी तब्बल ८८ वर्षांपूर्वी म्हणजेच १९३२ मध्ये पोलिस घोड्यांवरून मुंबईची पाहणी करत असत. मात्र त्यावेळी वाढत्या गाड्यांमुळे  हे पट्रोलिंग बंद करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा मुंबई पोलिस घोड्यांवरून शहराची पाहणी करणार पाहायला मिळतील. प्रजासत्ताक दिनाच्या शिवाजी पार्कवरील परेडनंतर तब्बल ३० घोडे मुंबई पोलिसांच्या सेवेत रुजू होणार आहेत अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलीये.

मोठी बातमी २३ तारखेपर्यंत बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा उभा करणं कठीण, वाचा काय झालाय प्रॉब्लेम

घोडे कशासाठी ?

मुंबई पोलिसांकडे सध्या उत्तम दर्जाच्या व्हॅन्स आणि गाड्या आहेत. मात्र मुंबईत वाढत्या वाहनांच्या गर्दीमुळे पोलिसांना गुन्हेगारांचा पाठलाग करता येत नाही. लहान रस्त्यांवर गाडी नेता येत नाही. त्यामुळे घोड्यावरून आता शहराची पाहणी केली जाणार आहे.  गर्दीच्या ठिकाणी किंवा सणांच्या वेळी गर्दी असल्यामुळे पोलिसांना पॅट्रोलिंग करता येत नाही. पोलिसांना वारंवार याचा त्रास सहन करावा लागतो आणि म्हणूनच हे पाऊल उचलल्याच गृहमत्र्यांनी म्हंटलय.

मोठी बातमी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा 'मोठा निर्णय'; दिले आदेश!

३० घोडे खरेदी केले जाणार

मुंबईसह पुणे आणि नागपुरमध्ये देखील हा प्रयोग राबवला जाणार आहे. सध्या मुंबई पोलिसांकडून  १३  घोडे खरेदी करण्यात आले आहेत. पुढच्या सहा महिन्यात ३० घोडे खरेदी केले जाणार आहेत. त्याचबरोबर एक आयुक्त, सह आयुक्त, ४ हवालदार आणि ३२ शिपाई या कामासाठी तैनात करण्यात येणार आहेत. या घोड्यांचा तबेला २.५ एकरच्या जमिनीत मरोळला बांधण्यात येणार आहे अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिलीये.  

mumbai police to start patrolling on horses from 26th of january  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai police to start patrolling on horses from 26th of january